Ritu Tawade : मुंबईच्या महापौर रितू तावडेंना दणका, सत्र न्यायालयाने ठोठवला दंड

Mumbai Mayor Ritu Tawde News : २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणात वारंवार न्यायालयात गैरहजर राहिल्याने मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा दंड ठोठावला.
Mumbai Mayor Ritu Tawade News
Mumbai Mayor Ritu Tawade NewsSaam tv
Published On
Summary
  • मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाचा दणका

  • सुनावणीला गैरहजर राहिल्याप्रकरणी ३०० रुपयांचा दंड ठोठवला

  • २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणात रितू तावडे यांच्यासह आठ आरोपींवर कारवाई सुरू

आशियातील सर्वात श्रीमंत मानली जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणात सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आहे. वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या नव्या अर्जाला परवानगी देताना न्यायालयाने तावडे यांच्यासह अन्य काही आरोपींना प्रत्येकी ३०० रुपये भरण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, वाकोला परिसरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत एका शिक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून रितू तावडे यांच्यासह अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण आठ आरोपींवर कारवाई सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाच्या मागील सुनावणीला रितू तावडे उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यानंतर न्यायालयाने त्यांना शेवटची संधी देत वैयक्तिक उपस्थितीतून सूट दिली होती.

Mumbai Mayor Ritu Tawade News
Jamun Seeds Benefits : जांभळाची बी आरोग्यासाठी फायदेशीर, शुगरपासून पचनाच्या त्रासावर करते मात

मात्र, त्यानंतर झालेल्या सुनावणीलाही तावडे तसेच अन्य काही आरोपी न्यायालयात गैरहजर राहिले. यावेळी आरोपींकडून पुन्हा वैयक्तिक उपस्थितीतून सूट मिळावी, यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. वारंवार गैरहजेरी आणि उपस्थितीतून सूट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रकाराची न्यायालयाने नोंद घेतली. नव्याने दाखल केलेला उपस्थितीतून सूट देण्याचा अर्ज मंजूर करताना न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड भरण्याचे निर्देश दिले.

Mumbai Mayor Ritu Tawade News
Feng Shui Turtle : भरपूर पैसा, नातंही फुलेल, 'ही' १ गोष्ट करेल घराचं गोकुळ; वास्तूशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या

या प्रकरणात आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून सध्या साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आगामी सुनावण्यांकडे आता लक्ष लागले आहे. न्यायालयाने उपस्थितीतून सूट देताना दंडाची रक्कम निश्चित केल्याने या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला पुन्हा एकदा वेग आला आहे. पुढील सुनावणीदरम्यान आरोपींची उपस्थिती आणि साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com