Uday Samant On Jarange Saam Tv News
महाराष्ट्र

Uday Samant: जरांगेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना जरा संयम बाळगावा; उदय सामंतांचा मित्रत्वाचा सल्ला

Uday Samant on Jarange Patil: जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच सल्लाही दिला आहे.

Bhagyashree Kamble

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बऱ्याचदा महायुती सरकारवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. त्यांनी नुकतंच राज्यभरामध्ये साखळी उपोषणाचाही इशारा दिला आहे. दरम्यान अंतरवाली सराटीतील काही मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. याच कारणामुळे मनोज जरांगे पाटील संतापले आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.

'तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', अशा शब्दात त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मित्रत्वाचा सल्लाही दिला आहे.

'ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना दहा टक्के दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे. निजाम कालीन कुणबी नोंदी मराठा समाजाला त्यानुसार प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे', असं मंत्री उदय सामंत म्हणाले. 'शिंदे समितीची मुदत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. जरांगे यांनी सरकारशी संवाद साधावा. जरांगे हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांना मी विनंती करतो की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे', असं उदय सामंत म्हणाले.

त्यांना जनतेनं निवडून दिलेले आहे

'देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जनतेनं निवडून दिलेले आहे. त्यांनी सरकारसोबत संवाद ठेवावा. आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. या गोष्टीकडे सकारात्मक आणि आदरानं पाहिलं पाहिजे. तसेच तुम्ही संवाद देखील साधला पाहिजे. गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज' असल्याचंही उदय सामंत म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलसा खेडकर यांच्यासह ९ वाळू माफियांना तडीपार करण्यात आलंय. हा आदेश अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहे. तडीपार करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ६ जण हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय होते. याच कारवाईमुळे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

'एकीकडे सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार, पण तसं होताना दिसत नाही आहे. उलट मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. आमच्या सरळ साध्या स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. अंतरवालीतील आंदोलकांना जर तुम्ही नोटीस पाठवणार असाल तर, फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही', अशा शब्दात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Daughter Royal Engagement: मुलीचं शाही लग्न, बोला इंदुरीकर काय करायचं?

Free Bike For Aadhaar Card Holders: आधारकार्ड असलेल्यांना मिळणार फ्री बाईक? केंद्र सरकारची फ्री बाईकची योजना?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात काँग्रेसच्या हालचालींना वेग

Parth Pawar: पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण

Why do Medu Vada have a hole: मेदू वड्याला मधोमध होल का पाडतात? जाणून घ्या रंजक कारण

SCROLL FOR NEXT