Badlapur News: प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका; पाईपलाईन दुरूस्तीचं काम संपेना

Badlapur road safety issues: राऊत चौकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. यामुळे नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे.
Badlapur News
Water Pipeline Saam Tv
Published On

बदलापुरातील शिरगाव परिसरातील राऊत चौकात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे नागरीकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. कोणत्याही सुरक्षिततेची खबरदारी न घेता हे खोदकाम सुरू आहे. पोकलेनच्या साह्याने काँक्रीट रोड खोदण्यात येत आहे. याचा सर्वाधिक त्रास स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थ्यांना होत आहे.

बदलापुरच्या शिरगाव परिसरातल्या राऊत चौकात पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. पाईप लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यापूर्वी रोड खोदण्याचं काम सुरू आहे. मात्र, रोड खोदण्याचं काम सुरू असल्यामुळे नागरीकांना याचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच काँक्रीट रोड बनवण्यात आला होता. मात्र, पाईपलाईन टाकण्यासाठी पुन्हा रोड खोदण्यात येत आहे.

Badlapur News
Road Accident: संभाजीनगरत भीषण अपघात, पिकअपची ट्रॉलीला धडक, आगीचा भडका उडाला, दोघांचा मृत्यू

बदलापूरच्या शिरगावातील राऊत चौक परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी शाळा असल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करत असतात. असं असताना पाईपलाईन टाकण्यासाठी भरदिवसा काँक्रीट रोड खोदण्याचं काम सुरू आहे. पोकलेनच्या साह्याने हा रोड खोदण्यात येत आहे.

Badlapur News
Devendra Fadnavis Raj Thackeray: राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी सगळं सांगितलं

सुरक्षेसाठी कोणतेही उपाय करण्यात आलं नसल्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरीकांना तसेच लहान मुलांनाही इजा होऊ शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महत्त्वाचं म्हणजे या भागात काही महिन्यांपूर्वीच काँक्रीट रोड बनवण्यात आला होता. पाईपलाईनच्या कामासाठी हा रोड खोदण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाला आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com