बीड: मनोज जरांगे पाटलांचे गुरु बीडच्या नारायण गडाचे महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान केले आहे. जरांगे पाटील पुढच्या काळात उपोषण करणार नाहीत, असे मोठे संकेत महंत शिवाजी महाराजांनी दिले आहेत. जरांगे पाटलांचा दसरा मेळावा होणारी नारायण गडाची भूमि ही तपाची भूमी आहे. आणि उपोषण देखील एक तप आहे आणि याच तपाची सांगता करण्यासाठी पुढे उपोषण करणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे या नारायण गडाच्या तपाच्या भूमित येत आहेत. असे मोठे विधान महंत शिवाजी महाराजांनी केले आहे.
दसरा मेळाव्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडच का निवडला? त्याचं कारण ही भूमी तपाची भूमी आहे, इथे साधू संतांनी तप केला आहे. नगद नारायण यांनी तपश्चर्या केली म्हणून पंढरपूरचा देव नारायणगडावर आले. तस आमच्या जरांगे पाटलांनी तप केला..उपोषण म्हणजे एक तप आहे आणि म्हणून या तपाची सांगता म्हणून इथ यायचं आणि या तपाची सांगता करायची, की इथून पुढे मी उपोषण करणार नाही. त्यामुळं ही प्रतिज्ञा करण्यासाठी मेळावा घेतला आणि यासाठी जरांगे पाटील येत आहेत. असं म्हणत महंत शिवाजी महाराजांनी मोठे विधान आणि संकेत दिले आहेत.
तत्पुर्वी मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी उपोषण सोडले, त्यावेळी महंत शिवाजी महाराजांच्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडल आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचा शब्द म्हणजे जरांगे पाटलांसाठी शेवटचा शब्द आहे. त्यामुळे महंत शिवाजी महाराजांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होत आहे. अवघ्या काही दिवसांवर हा दसरा मेळावा येऊन ठेपला असताना आता नारायणगड येथील शेकडो एकरवर दसरा मेळाव्याची जंगी तयारी सुरू आहे. शेकडो एकरवर हा दसरा मेळावा होत असून आता मैदान स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर या मैदानावर 20 बाय 20 आणि 15 फूट उंच असं स्टेज उभारण्यात आले आहे. शेकडो एक्करवरील परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आवाज ऐकायला मिळावा म्हणून साऊंड सिस्टमसह, लाईटची, पाण्याची , डॉक्टर, अँब्युलन्स यासह सर्व सुविधांची तयारी केली जात आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.