Rohit Pawar On Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Sagar Bungalow : 'सागर बंगला भाजप आमदारांना वाचवण्यासाठी', आमदार रोहित पवारांचा निशाना

Rohit Pawar On Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला हा भाजप नेत्यांना व त्यांच्या आमदारांना वाचवण्यासाठी आहे: रोहित पवार

साम टिव्ही ब्युरो

>> भारत नागणे

Rohit Pawar On Devendra Fadnavis:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला हा भाजप नेत्यांना व त्यांच्या आमदारांना वाचवण्यासाठी आहे. याच सागर बंगल्याचा वापर हा राजकीय कुटुंब फोडण्यासाठी त्यांनी केला आहे. मात्र सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी सागर बंगला कुठेच दिसत नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

तसेच तुतारी वरून टीका करणारे भाजप आमदार नितेश राणे यांना सेलिब्रिटी आमदार म्हणत आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या तुतारी या चिन्हाचे पूजन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.  (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्याशिवाय इतर खात्यात जास्त वेळ देण्याची गरज आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार पेक्षा जास्त अन्याय सामान्य नागरिकांवर आपल्या राज्यात होतो आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आपल्या खात्याकडे लक्ष द्यावे, असंही यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि संस्कृती खराब करण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. पैशाचा वापर करून एकता समानता नष्ट केली. जातिवाद व धर्मवादाला 2014 सालानंतर राज्यात चालना मिळाली गेली. लोकांच्या प्रश्नापेक्षा वादावर अधिक चर्चा फडणवीस करतात. पार्ट्या फोडल्या कुटुंबे फोडली, अशी घणाघाती टीकाही रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : मुंबईत एसीबीची सर्वात मोठी कारवाई; पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT