PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची समुद्रात स्कुबा डायव्हिंग; संपूर्ण अनुभवानंतर म्हणाले...

Pm Narendra Modi In Dwarka: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज रविवारी त्यांचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Saam Digital
Published On

Pm Narendra Modi Scuba Diving Off Gujarat

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज रविवारी त्यांचा गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज मोदींनी समुद्रात नौदलाच्या जवानांसोबत स्कूबा डायव्हिंग करण्याचा अनुभव घेतला. यावेळी द्वारका शहरांतील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवर पोस्ट करत स्कूबा डायव्हिंगचा अनुभव आणि फोटो शेअर केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi
International Friendship Day 2023 : आज सेलिब्रेट करुया मैत्री! जाणून घ्या काय फ्रेंडशिप डेचा इतिहास आणि महत्त्व

गुजरातमधील ओखा येथे बांधण्यात आलेल्या सुदर्शन पुलाचे उद्धाघन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री कृष्णाची नगरी द्वारका येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रविवारी 'जय द्वारकाधीश'च्या जयघोषात लोकांनी जोरदार स्वागत केले. द्वारकाधीशांच्या दर्शनासाठी द्वारका हेलिपॅडवरून उतरत मंदिराकडे निघाले. यावेळी वाटेत मोदींचे नागरिकांनी स्वागत केले. स्वागत करताना अनेक महिलांनी गरबा नृत्य केला. तर कृष्ण, ढोल ताशाच्या गजरात लोकांनी मोदींचे स्वागत केले. रस्त्यालगत नागरिक पीएम मोदींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या स्टेजवर कलाकारांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पंतप्रधान मोदींनीही नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. तत्पूर्वी, द्वारका हेलिपॅडवर यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी.आर. पाटील, रमेशभाई धाडुक, मुख्य सचिव राज कुमार, पोलीस महासंचालक विकास सहाय, जिल्हाधिकारी जी.टी. पंड्या यांच्यासह अनेकमान्यवरांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

दरम्यान, या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दुसरा दिवस अनेक अर्थाने महत्वाचा ठरला. द्वारका शहरास भेट देण्यासाठी गेलेल्या मोंदीनी आज द्वारकामधील पाण्यात स्कुबा डायव्हिंग केली. समुद्रात डुबकी घेताना मोंदीनी श्रीकृष्णाला नमस्कार केला. तसेच पाण्यात जाण्याआधी मोंदीच्या कमरेला मोराची पिसेही बांधण्यात आली होती. या सर्व क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाण्यात डुबकी मारल्यानंतर प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. आम्हा सर्वांना भगवान श्री कृष्ण आशीर्वाद देवो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi
Mexico International Airport: फ्लाइट टेक ऑफ होणारच होती..इतक्यात इमर्जन्सी गेट उघडून प्रवासी आला बाहेर अन् केलं भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com