International Friendship Day 2023 : आज सेलिब्रेट करुया मैत्री! जाणून घ्या काय फ्रेंडशिप डेचा इतिहास आणि महत्त्व

Friendship Day 2023 : जगातील सर्वात निस्वार्थी नात म्हणजे मैत्रीचं नातं.
International Friendship Day 2023
International Friendship Day 2023Saam Tv
Published On

International Friendship Day : जगातील सर्वात निस्वार्थी नात म्हणजे मैत्रीचं नातं. कोणताही स्वार्थ किंवा भेदभाव न मैत्रीचं नात एकमेकांना बांधून ठेवते. याच मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी जगभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

हा दिवस वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. त्यामुळे भारतात हा दिवस कोणत्या तारखेला साजरा (Celebrate) केला जातो याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला भारतातील फ्रेंडशिप डेबद्दल सांगणार आहोत.

फ्रेंडशिप ही प्रत्येकाच्याच आयुष्यात खूप म्हत्त्वाची असते. त्यामुळे वर्षातून एकदा आपल्या मैत्रीचे सेलिब्रेशन करण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. हा दिवस 30 जुलै तर काही भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो.

International Friendship Day 2023
Chanakya Niti On Friendship : तुमचे खरे मित्र ओळखण्यासाठी या 4 गोष्टी माहित असणे आवश्यक

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन केव्हा असतो

मैत्री दिन (Friendship Day) वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. काही देशात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर काही देशांमध्ये 30 जुलैला हा दिवस साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डे कसा सुरु झाला

1958 मध्ये पॅराग्वे या देशाने फेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावावर विचार करुन संयुक्त राष्ट्रानी 30 जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 30 जुलैला अनेक देशांमध्ये मैत्री दिन साजरा केला जातो.

International Friendship Day 2023
Love Vs Friendship: प्रेम की मैत्री, नातं कसे ओळखाल?

भारतात मैत्री दिन कधी साजरा करतात

काही देशात मैत्री दिन 30 जुलैला साजरा करतात.परंतु भारतात ऑगस्टच्या (August) पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करतात. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतासह मलेशिया, युनायटेड स्टे्टस ऑफ अमेरिका(USE), संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि बांगलादेश या देशात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मैत्री दिन साजरा करतात.

महत्त्व

आपल्या आयुष्यात बरीच नाती असतात. मैत्रीचे नाते हे आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे असते.त्यामुळे मैत्रीला साजर करण्यासाठी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com