Chanakya Niti : खरा मित्र माणसाचे आयुष्य बदलू शकतो. जीवनात खऱ्या मित्राचे खूप मोठे योगदान असते. आचार्य चाणक्य यांचे नाव भारतातील महान विद्वानांमध्ये समाविष्ट आहे. आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करून जीवनात यश मिळवता येते.
आचार्य चाणक्यांनी खऱ्या मित्राचे काही संकेत दिले आहेत. जसा खरा मित्र (Friend) माणसाचे नशीब बदलू शकतो. त्याचप्रमाणे वाईट मित्र माणसाचे आयुष्य उध्वस्त करू शकतो. चला जाणून घेऊया खऱ्या मित्राची लक्षणे कोणती आहेत.
जे संकटातही पाठीशी उभे असतात
आचार्य चाणक्य यांच्या मते, तुमचा खरा मित्र तोच असतो जो तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही साथ देतो. असा मित्र मिळाल्याने माणूस कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडतो. अशा व्यक्तीसोबत कधीही राहू नका जो तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीत सोडू जातो.
आर्थिक संकटात मदत करणारा मित्र
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो आर्थिक (Financial) अडचणीत तुम्हाला मदत करण्यास तयार असतो तोच तुमचा खरा मित्र असतो. जो मित्र तुम्हाला संकटात पाहू शकत नाही आणि तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्व प्रयत्न करतो तोच तुमचा खरा मित्र.
जो तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुमच्या पाठीशी उभा असतो
एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर एखादी व्यक्ती तुटते. तेव्हा त्याला सर्वात जास्त आधाराची गरज असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जो मित्र अशा वेळी तुमच्या पाठीशी उभा राहतो तोच तुमचा खरा मित्र असतो.
जी व्यक्ती आजारपणातही तुमची साथ सोडत नाही
आचार्य चाणक्य यांच्या मते खरा मित्र तोच असतो जो तुमच्या आजारपणातही (Disease) तुमची साथ सोडत नाही. माणसाचे जीवन यशस्वी करण्यासाठी खरे मित्र उपयोगी पडतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.