Chanakya Niti On Human Behaviour : सापापेक्षा जास्त धोकादायक असतात अशा व्यक्ती, वेळीच अंतर ठेवा; अन्यथा...

Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे जगातील सर्वात लोकप्रिय अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
Chanakya Niti On Human Behaviour
Chanakya Niti On Human Behaviour Saam TV

Chanakya Niti On Behaviour : आचार्य चाणक्य हे जगातील सर्वात लोकप्रिय अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेली चाणक्य नीती आजही वाचली जाते आणि लोक त्यांच्या जीवनात त्यांची शिकवण लागू करतात. असे म्हणतात की जो कोणी या शिकवणी आपल्या जीवनात घेतो तो नक्कीच यशस्वी होतो.

यात आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांबद्दल देखील सांगितले आहे, जे सापासारखे (Snake) असतात आणि अशा लोकांना आपल्यापासून लवकरात लवकर लांब केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया कशा लोकांबद्दल, ज्यांच्यापासून लवकरात लवकर अंतर ठेवावे -

Chanakya Niti On Human Behaviour
Chanakya Niti On Bad Habits : या 4 सवयींमुळे मेहनत करूनही तुम्ही करिअरमध्ये ठरता अपयशी, जाणून घ्या चाणक्य निती काय म्हणते...

आचार्य चाणक्य म्हणतात की जीवनात खरा मित्र नेहमीच असावा. पण खोटे मित्र ठेवू नये कारण खोटा मित्र हा सापासारखा असतो. अशा मित्रामुळे तुम्ही कधीही अडचणीत येऊ शकता. या कारणास्तव, खोट्या मित्रांपासून (Friends) नेहमी अंतर ठेवावे.

आचार्य चाणक्य नुसार दुष्ट पत्नीपासून नेहमी अंतर ठेवावे. अशी पत्नी तुमचे जीवन नरक बनवते. अशा बायकोसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. आचार्य चाणक्य म्हणतात की, वाईट वागणूक असलेल्या पत्नीला नेहमी दूर ठेवले पाहिजे.

Chanakya Niti On Human Behaviour
Chanakya Niti On Women Behaviour : मुलांनो! अशा स्त्रियांपासून लांब राहा, यांचा सहवास संपूर्ण घराला उध्वस्त करू शकतो

आचार्य चाणक्य म्हणतात की घरात नेहमी एक विश्वासू नोकर असावा कारण त्याला घरातील सर्व रहस्ये माहित असतात. जर नोकर बदमाश झाला तर तो तुमच्या कुटुंबावर (Family) संकट निर्माण करू शकतो. अशा नोकराला ताबडतोब काढून टाकावे कारण तो घरातील रहस्ये इतर कोणालाही सांगू शकतो. यामुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com