Chanakya Niti On Women Behaviour : मुलांनो! अशा स्त्रियांपासून लांब राहा, यांचा सहवास संपूर्ण घराला उध्वस्त करू शकतो

Chanakya Niti for Woman : चाणक्य नीती मध्ये जीवनातील प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यात आला आहे.
Chanakya Niti On Women Behaviour
Chanakya Niti On Women BehaviourSaam Tv
Published On

Chanakya Niti On Character Of Women : चाणक्य नीती मध्ये जीवनातील प्रत्येक पैलू स्पष्ट करण्यात आला आहे. स्त्री आणि पुरुषाचे चारित्र्य कसे असावे हे सांगितले आहे. नवरा-बायकोपैकी कोणाच्याही चारित्र्यावर दोष असेल तर हसत हसत संसार विखुरतो.

दुसरीकडे, स्त्री-पुरुषांचे चांगले आणि मजबूत चारित्र्य घराला (Home) स्वर्ग बनवते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रियांच्या चारित्र्याबद्दलही खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार विशिष्ट प्रकारच्या स्त्रियांचा सहवास टाळावा, अन्यथा आयुष्य उद्ध्वस्त होते.

Chanakya Niti On Women Behaviour
Chanakya Niti On Success : या लोकांकडे फिरकतही नाही वाईट काळ, असतात सतत यशाच्या वाटेवर

अशा महिलांपासून दूर राहा

आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्री ही देवीसारखी असते, तिला घरची लक्ष्मी म्हणतात. घराला स्वर्ग आणि नरक दोन्ही बनवण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, त्यामुळे जीवनसाथी म्हणून स्त्रीची निवड अत्यंत काळजीपूर्वक करायला हवी. एवढेच नाही तर अशा महिलेसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, अन्यथा कधीही अडचणीत येऊ शकता.

अशी स्त्री जिचे चारित्र्य योग्य नाही, असभ्य वर्तन (Behaviour) करते. त्याची संगत चांगले जीवन नरक बनवू शकते. तसेच, अशा महिलेमुळे संपूर्ण कुटुंबाची बदनामी होते.

अशी स्त्री जी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत नाही, मोठ्यांचा आदर करत नाही, तिची संगत तुम्हाला, कुटुंबापासून आणि नातेवाईकांपासून दूर करू शकते. यासोबतच अशा महिलेमुळे कुटुंबाची बदनामीही होते.

Chanakya Niti On Women Behaviour
Chanakya Niti On Youngster : तारुण्यात या 3 गोष्टींपासून राहा दूर, उतार वयात राहाल सुखी...

अशी स्त्री जी अशिक्षित आहे, विनाकारण पैसे (Money) खर्च करते, मुलांना चांगले संस्कार देत नाही, अशी स्त्री कुटुंबासाठी देखील चांगली नाही. ते घर आर्थिकदृष्ट्या अस्थिर करतात. यासोबतच नवीन पिढीचे चांगले संगोपन न केल्याने त्यांची मोठी हानी होते.

दुष्ट आणि लोभी स्त्रीच्या सावलीपासूनही दूर राहणे चांगले. अशा महिलेची संगत तुम्हाला कधीही मोठ्या संकटात टाकू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com