Manoj Jarange Saam TV
महाराष्ट्र

Maratha Andolan: मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मनोज जरांगेंनी केली कळकळीची विनंती, म्हणाले...

मनोज जरांगे यांनी गोरगरिबांना मुलांना आरक्षण कसं मिळेल याचा विचार बैठकीत करावा, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली.

लक्ष्मण सोळुंके

maratha Andolan News:

जालन्यात अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या म्हणजे ११ सप्टेंबर रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावली. यानंतर मनोज जरांगे यांनी गोरगरिबांना मुलांना आरक्षण कसं मिळेल याचा विचार बैठकीत करावा, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मुंबईत उद्या सर्वपक्षीय मराठा आरक्षणावर बैठक असेल, तर त्यांना वाकून कळकळीची विनंती आहे की, त्यांनी कुठलीही आड काठी न घालता गोरगरिबांच्या मुलांना आरक्षण कसं मिळेल याचा विचार करावा. त्या मुलांचं घर, त्या मुलांचं गाव, त्यांच्या अंगावर फाटलेले कपडे याचा विचार करावा’.

‘गोरगरीब मुलांच्या बापाचं स्वप्न असतं की, आपला मुलगा कुठं तरी नोकरीला लागेल. तुम्ही त्याच्या स्वप्नाचा विचार करा. त्याचे मायबाप बना, पालक बना, त्याच्या विचार करा. तु्म्ही आर्शीवादरुपी आरक्षणावर तोडगा काढा. आमच्या वेदना, आमचा आक्रोश घेऊन बैठकीला जा. उद्या होणारी बैठक यशस्वी करा. मी तुमचा नतमस्तक होईल, असे ते म्हणाले.

‘मी एक पाऊल मागे सरकत त्यांचा सन्मान केला. त्यांच्या ज्या त्रुटी आहेत, त्या पूर्ण करतो असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाची वाट बघत आहे. आमचं मत असं आहे की, २००४ सालचा शासन निर्णय लागू करा. त्यात आम्ही समाधानी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आमची मागणी पूर्ण करतील, असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT