Manoj Jarange Patil Devendra Fadnavis x
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठे हिंदू नाहीत का? जातच संपली, तर धर्म कसा टिकवायचा? जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हिंदू-मुस्लीम वादावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Yash Shirke

  • मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

  • आरक्षणासाठीच्या मोर्चासाठी जरांगे पाटील तयारी करत आहेत.

  • सध्या जरांगे पाटील हे अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत.

सुशील थोरात, साम टीव्ही, प्रतिनिधी

Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदू-मुस्लिम वादासंदर्भात भाष्य करताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठे हिंदू नाहीयेत का? जर जातचं संपली, तर मग धर्म कसा टिकवायचा? असा सवाल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. ते अहिल्यानगरमध्ये बोलत होते.

'त्यांना फक्त दंगली करुन मत घ्यायची आहेत. आम्ही देखील हिंदू आहोत, मग आम्हाला आरक्षण का नाही? मराठे फक्त मारामारी करण्यासाठीच आहेत का? आम्ही हिंदू नाही का? आम्ही आहोत हिंदू आहोत. पण आज हे सरकार आमची जातच संपवायला निघालं आहे. आज आम्हाला आमचाच हिंदू विरोध करत आहे. छगन भुजबळ कोण आहेत? त्यांना कोणी काही बोलत नाही, तू हिंदू आहेस, मग आरक्षणाला विरोध का करतोस?', असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा नेत्यांना संपवण्याच्या तयारीत आहेत. मला आतापर्यंत ३० ते ३२ आमदार व खासदारांचे फोन आले आहेत. भारतीय जनता पक्षातील अनेक मराठा नेते त्यांना त्रास दिला जात आहे हे मला फोन करुन सांगत आहेत', अशी धक्कादायक माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईमध्ये २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईकडे मोर्चा या मोर्चाच्या तयारीसाठी जरांगे पाटील हे ठिकठिकाणी भेटी देत मराठा समाजातील बांधवांशी संवाद साधत आहेत. सध्या ते अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुठल्या उमेदवाराला किती खर्च मर्यादा? अ, ब, क, ड वर्गात कोणत्या २९ महापालिका? निवडणूक आयोगाकडून A टू Z माहिती

Pune: ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मावळमध्ये संतापाची लाट; आरोपीला फाशी द्या, गावात कडकडीत बंद

BP Control: BP च्या गोळ्या घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल? डॉ. रवी गोडसेंनी दिल्या महत्वाच्या टिप्स, एकदा वाचाच

Maharashtra Politics: मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये हायव्होल्टेज लढती; महापालिका निवडणुकांमध्ये बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला|VIDEO

राज आणि उद्धव एकत्र आले तर काय? CM फडणवीसांनी ४ शब्दात विषय संपवला

SCROLL FOR NEXT