Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना पहिल्या खपक्यातच पाडणार; मनोज जरांगे कडाडले

Rohini Gudaghe

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही

मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पहिल्या खपक्यातच पाडणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. यापुढे आम्ही ताकतीने काम करणार असून आता जत्रेला नाही, पण नेत्यांना पाडायला जाणार असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. सगेसोगरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करून सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

दरम्यान, जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपण आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही, तर मराठा समाजाला त्रास देत असल्याचा आरोप करत त्यांनी काही नेत्यांना इशारा देखील दिला. मराठ्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पहिल्या खपक्याच पाडणार, असं जरांगे म्हणाले.

आता जत्रेला जाणार नाही पण नेत्यांना पाडायला जाणार असं वक्तव्य मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केलं. सरकारने आम्हाला आरक्षण द्यावं. नाही दिलं तर नाईलाजाने आम्हाला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल, असंही जरांगे म्हणाले.

सरकारने बीड जिल्ह्यातील घटनांवर आवर घालावा, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावं, अशी विनंती देखील जरांगे यांनी केली. सरकारच्या वतीने अजून मला कुणीही भेटायला आलेलं नाही. काय होतंय, ते बघू या. नेत्यांनी सांगितल्याशिवाय ते शांत बसत नाही. नेतेही त्यांना शांत बसायचं सांगत नाही, त्यांना शांतता नको आहे अशी टीका जरांगे पाटलांनी विरोधकांवर केली आहे.

बीड निवडणुकीवर जरांगे पाटील म्हणाले की, परळी बंदची हाक, अश्लील स्टेटस तसं करायला (Manoj Jarange Patil Press Conference) नको. कुणाचेही स्टेटस ठेऊ नका. निवडणुकीआधी देखील मी हेच सांगितलं होतं, एखाद्याने टाकलं असेल म्हणजे समाजाने टाकले असे नाही, पण त्यासाठी एवढी शक्ती दाखवण्याची गरज नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सर्वांनी शेतीची कामे करा. अंतरवालीत येऊ नका, मी लढण्यासाठी खंबीर आहे असं जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना सांगितलं आहे. मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे. मराठ्यांच्या मुलांना बीड जिल्ह्यात विनाकारण मारहाण (Maratha Aandolan)झाली. गेवराई तालुक्यात ही घटना घडली. जातीयवादाच्या नावाखाली ही हाणामारी सुरू आहे. गृहमंत्री आणि बिडच्या पोलीस अधीक्षकांनी या घटनांना आवर घालावा, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

SCROLL FOR NEXT