Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: आमदारांनी मराठ्यांच्या बाजूने बोलावं अन्यथा.. विशेष अधिवेशनाआधी जरांगे पाटलांचा इशारा

डॉ. माधव सावरगावे

Manoj jarange Patil Press Conference:

मराठा आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्या मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाणार आहे. उद्या मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळेल. याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

"ओबीसी समाजला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाने ओबीस आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या जो कायदा होणार आहे त्याचं कौतुक, आनंद होणारच आहे. मात्र सरकारला सगे सोयऱ्यांबाबत भूमिका मांडावीच लागेल, फक्त अधिसुचना काढून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी करावी लागेल," असे मनोज जरांगे (Manoj jarage Patil) पाटील म्हणाले.

नेत्यांना इशारा...

"उद्या अधिवेशनात मराठा आमदारांनी आरक्षणाच्या (Maratha Reservastion) बाजूने बोलावं. सगे सोयऱ्यांच्याबाबत एकमताने आवाज उठवावा. मंत्री महोदयांनी आणि आमदारांनी राजकारण सोडून स्पष्ट आरक्षण मागावे. मराठ्यांनी काय आमची पोरं बरबाद करण्याचा आणि तुम्हाला मोठं करण्याचा ठेका घेतलाय का?नेते जर उद्या उभे राहिले नाहीत तर ते मराठा विरोधी आहेत हे निश्चित होईल," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अन्यथा बोलणे बंद...

दरम्यान, "सगेसोयऱ्याबाबतची अंमलबजावणी केली नाही तर 21 तारखेला आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मग बोलणंसुद्धा बंद होऊ शकतं. आजचा, उद्याचा दिवस आहे. आम्ही 20 चीच वाट बघणार आहोत, 20 तारखेला लक्षात येईल अंमलबजावणी करणार आहेत की नाही," असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तुरुंगातून सुटका होणार का? सुप्रीम कोर्ट अंतरिम जामिनावर काय म्हणालं?

SCROLL FOR NEXT