Manoj Jarange vs Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News: मराठा समाज माझ्या पाठीशी, हिम्मत असेल तर जेलमध्ये टाकाच; मनोज जरांगेंचं ओपन चॅलेंज

Manoj Jarange Patil News: मराठा समाज माझ्या पाठीमागे आहे. हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं ओपन चॅलेंज जरांगेंनी सरकारला दिलं आहे.

विनोद जिरे

Manoj Jarange vs Devendra Fadnavis

कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मराठा समाज माझ्या पाठीमागे असून हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं ओपन चॅलेंज जरांगेंनी सरकारला दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ८ दिवस उपोषण करून बघावं, पोट आपोआप कमी होईल, असा टोलाही जरांगेंनी लगावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बुधवारी (ता. १३) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. राजकीय पुढाऱ्यांनी मराठा बांधवांच्या दारात येऊ नये, अन्यथा तुम्हाला रोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचे नाही, अशा पोस्टरचे जरांगेंनी यावेळी प्रदर्शन केले. त्याचबरोबर जरांगेंनी फडणवीसांवर तोंडसुख देखील घेतलं. तुम्हाला तुमची आई बहीण दिसली, पण आमची अंतरवली येथे आमच्या आई-बहिणींना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवालही जरांगेंनी विचारला. (Latest Marathi News)

"छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेश जारी केला जात नाही. तोवर मी तुम्हाला सोडणार नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिम्मत लागते. माझ्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे", असं आव्हान देखील जरांगेंनी फडणवीसांना दिलं.

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "तुम्ही ४ वेळा समाजाला फसवलं मागच्या ६ महिन्यापासून आम्ही आपल्याला विनवण्या करत आहोत अन् तुम्ही आमचे ऐकत नाहीत म्हणल्यावर आम्ही थोड बोलणारच. मग आपल्याला राग नाही आला पाहिजे. मला राजकारण्यांचे देणे घेणे नसून फक्त आरक्षण हवंय. फडणवीस साहेब तुमच्यासोबत आमचं शत्रूत्व नाही", असंही जरांगे पाटील म्हणाले.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Crime News: चहावाल्याच्या घरी सापडलं घबाड; १ कोटींची रक्कम अन् सोने,चांदी; दोन भावांचा कांड पाहून अधिकारीही चक्रावले

SCROLL FOR NEXT