Manoj Jarange Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: 29 ऑगस्टला मराठ्यांचं आंदोलन मुंबईत? अवैध दाखल्यांमुळे जरांगेंचा इशारा, जरांगे पुन्हा सरकारची डोकेदुखी वाढवणार?

Manoj Jarange: जरांगे पाटलांमुळे पुन्हा एकदा सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण मराठ्यांचं वादळ पुन्हा मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. जरांगेंनी नेमका काय इशारा दिलाय? जरांगेंनी नेमकी काय रणनीती बदललीय?

Suprim Maskar

Manoj Jarange: ऑगस्टला कुणबी प्रमाणपत्रावरून उपोषणाचा इशारा देणाऱ्या जरांगेंनी आता आपली रणनीती बदललीय...कुणबी दाखले जात पडताळणीत रद्द होत असल्यामुळे जरांगेंनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याचा इशारा दिलाय. आणि यावेळ केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर इतर राज्यांमधील मराठेही आंदोलनात सहभागी होणार असल्याचं जरांगेंचं म्हणणंय.

दरम्यान सरकारनं चुक कबुल करून अवैध ठरवलेले जात प्रमाणपत्र पुन्हा वैध करण्याची मागणी जरांगेंनी केलीय. मात्र महसूल खात्याचा संबंध केवळ जात प्रमाणपत्र वाटपाचा असून 22 लाख प्रमाणपत्र दिल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय.

मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक घेण्यात आली. मात्र त्यात कुणबी नोंदीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे यावर तातडीनं तोडगा निघाला नाही तर जरागें 29 ऑगस्टला आंतरवाली सराटीत उपोषण करण्याऐवजी पुन्हा मुंबईत धडक देणार आणि सरकारची डोकेदुखी वाढवणार का याकडे सारं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Corporation: पुणेकरांचे 254 कोटी खड्ड्यात; महापालिका-कंत्राटरांच्या अभद्र युतीतून लूट?

'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

SCROLL FOR NEXT