Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'कोण आहे रे तिकडे, की छगन भुजबळ आलेत'; मनोज जरांगें यांची सांगलीत तुफान फटकेबाजी

Manoj Jarange Patil News/Maratha Resrervtion : मनोज जरांगें पाटील यांनी राज्यभर सुरू केलीली मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली आज सांगली असून जरांगेंची यावेळी तुफान फटकेबाजी पहायला मिळाली.

Sandeep Gawade

मनोज जरांगें पाटील यांनी राज्यभर सुरू केलीली मराठा आरक्षण जागृती शांतता रॅली आज सांगली आहे. जरांगेंची यावेळी तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला नोटीसच पाठवली आणि समजलं की माझ्या मागे एसआयटी पण आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले, असा आरोप केला. यावेळी रॅलीत सुरू असलेल्या गोंधळाला शातं करण्यासाठी त्यांनी, कोण आहे रे तिकडे की छगन भुजबळ आलेत, असं म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

तुम्हाला तुमचा पक्ष मोठा करायचा आहे पण मला माझ्या मराठ्यांचे लेकरं मोठे करायचे आहेत. छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक नेते माझ्या विरोधात उभे केले. मी आरक्षण मागत आहे ना की माझी जात मोठी करत आहे. भुरट्या चोरापासून सगळे देवेंद्र फडणवीसकडेच आहेत. सगळे भुरटेच माझ्या मागे लावले आहेत.

एकदा आरक्षण मिळू द्या. मग तुम्ही कुठल्या पक्षात जायचं ते जा. सगळ्या जाती धर्मांना वाटले आपण पण एक झाले पाहिजे. महाराष्ट्रला नवीन आदर्श सांगली जिल्ह्याने दिला आहे. भर पावसात मराठा बांधव उभे होते. मी आज सकाळपासून अस्वस्थ आहे. तुम्हाला आरक्षण देईपर्यंत मी मागे हटणार नाही. आरक्षण म्हणजे त्यांच्या बापाची जहागीरदारी नाही. फक्त एकदाच साथ द्या यांच्या छताड्यावर पाय ठेवू, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT