Manoj Jarange Patil hunger strike latest news in Maharashtra saam tv
महाराष्ट्र

मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देताना महिला ढसाढसा रडल्या.. म्हणाल्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल

Manoj Jarange Patil Hunger Strike Latest News In Maharashtra: मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवालीसराटीतील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महिला भावूक झाल्या. आरक्षणाची मागणी मान्य न केल्यास मुंबईपासून दिल्लीपर्यंत लढा देऊ असा इशारा महिलांनी दिला.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

जालना: जिल्ह्यातील आंतरवालीसराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून महिला भगिनींनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांची प्रकृती पाहून महिला भगिनी या ढसाढसा रडल्या असून त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिला मिळाले. तर सरकारला या महिलांच्या अश्रूची किंमत मोजावी लागेल असा इशाराही महिलांनी दिला आहे. सरकारने 1500 रुपये देऊन आम्हाला साखर फेकली.

मात्र, या मुंग्यांना जी साखर फेकली. आता याच मुंग्या सरकारला आता सळो की पळो करतील. जरांगे वर्षावर चला म्हटले तर वर्षावर जाऊ, जरांगे पाटील दिल्लीला चला म्हटले तर दिल्लीला जाऊ, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही महिला भगिनी परतणार नाही. लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीच्या भावाला रडायला लावता. आमचा भाऊ आज मरणाच्या दारात आहे. सरकार तुम्हालाही जड जाईल असा इशाराही महिलांनी दिला आहे.

यावेळी काही महिला आणि तरुणींनी साम टीव्हीशी संवाद साधला. याआधी मनोज जरांगे हे दोनवेळा मुंबईला गेले. पण ह्यावेळेस आम्ही हार मानणार नसून आरक्षण घेऊनच माघारी येऊ. तसेच मनोज जरांगे यांना उपोषणाने त्रास होत आहे. आता पर्यंत खूप सहन केलं पण आता माघार घेणार नाही. असा इशारा महिलांनी दिला. तसेच लाडकी बहीण योजनेमार्फत जे 1500 दिले ते परत घ्या आणि आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी महिलांनी सरकारकडे केली.

तसेच आमची शेतकऱ्यांची मुलं हुशार असून ते मोठ्या पदावर जाऊ शकत नाही आणि काहीजण आरक्षणामुळं या पदावर जाऊन बसले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावं आणि लढावं. आम्ही लढण्यासाठी कुठेही जायला तयार आहे. मुंबई काय आम्ही जरांगेंसोबत दिल्लीला जायला तयार आहे पण त्यांनी उपोषण सोडावं आणि सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी करत असतानाच महिलेला अश्रू अनावर झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! दुपारी दीड वाजता इंडिया आघाडी रस्त्यावर, सुप्रीम कोर्टावर महामोर्चा

Maharashtra News Live Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मध्यरात्री तीन वाजता मुलींच्या वसतिगृहात गोंधळ

Gold Rate Today: नवरात्र सुरू होताच सोनं स्वस्त, तुमच्या शहरातील २४-२२-१८ कॅरेट सोन्याचे ताजे दर

Tap Cleaning Tips: स्टीलच्या नळांवरील डाग काढण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; वापरा 'या' घरगुती टिप्स

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

SCROLL FOR NEXT