Manoj Jarange Patil Strike News Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : बीपी आणि शुगर कमी झाल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपचारास दिला नकार

Manoj Jarange Maratha Strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. उपोषणाच्या १९ व्या दिवशी बीपी आणि शुगर कमी झाल्याने प्रकृती खालावली असून उपचार व वैद्यकीय तपासणीस नकार दिल्याचे वृत्त आहे.

Alisha Khedekar

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस

  • जरांगे यांची प्रकृती खालावली

  • बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती

  • मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून आज त्यांच्या उपोषणाचा 19 वा दिवस आहे. दरम्यान, काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ असतानाही उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगितले जात आहे.

जरांगे पाटील सध्या बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी आहेत. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्या पुढील दौऱ्याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सहकाऱ्यांमध्ये त्यांच्या प्रकृतीसह पुढील आंदोलन आणि मुंबईकडे जाण्याच्या नियोजनावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. बीपी आणि शुगर कमी झाल्याने वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात असले, तरी जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे.

दुसरीकडे, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी अद्याप मिळालेली नाही. मुंबई पोलिसांनी यापूर्वी त्यांचा परवानगी अर्ज नाकारला असून, त्यानंतर पुन्हा अर्ज करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्यांदा देखील परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे. परवानगीचा प्रश्न कायम असतानाही मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. आज परवानगी न मिळाल्यास त्यांच्या वकिलांकडून हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता एकीकडे जरांगे पाटील यांची ढासळलेली प्रकृती आणि दुसरीकडे मुंबई आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न, अशा दुहेरी परिस्थितीत पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होते का आणि मुंबईकडे जाण्याच्या त्यांच्या पुढील नियोजनाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे समर्थकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khari Shankarpali Recipe : दिवाळीत बनवा कुरकुरीत खारी शंकरपाळी; चहासोबत खाण्याची मजाच वेगळी, वाचा झटपट होणारी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये १७०० शिक्षक मतदानात नापास

Good News: मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज, ऑनलाईन बुक करता येणार दारू; सरकारची मोठी घोषणा, काय आहे प्रोसेस?

Bharli Vangi Recipe: घरच्या घरी बनवा अस्सल गावरान भरली वांगी; चव चाखून प्रत्येकजण करेल कौतुक

True Love Signs: ती व्यक्ती तुमच्यावर जिवापाड प्रेम करते हे कसे ओळखाल? लक्षात घ्या 'ही' ५ गुपिते

SCROLL FOR NEXT