Manoj Jarange Health Update Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Health Update: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; बीडमधील रुग्णालयात केलं दाखल

Manoj Jarange Patil Health Update News: मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. बीडमध्ये जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे बीडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विनोद जिरे

Manoj Jarange Patil Health Update:

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. राज्यभरातील गावागावात जरांगे पाटील सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना हजारो लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी हाती आली आहे. बीडमध्ये जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे बीडमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे आज सकाळी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यातील सभेत भाषण करताना अचानक स्टेजवरच बसले. त्यामुळे पुढील सर्व भाषण त्यांनी खुर्चीवर बसून केलं होतं. भाषण झाल्यानंतर डॉक्टरांनी स्टेजवरच त्यांनी वैद्यकीय तपासणी केली होती.

डॉक्टरांनी तपासणीनंतर विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यानंतरच्या बीडमधील सभेनंतर त्यांना अंबाजोगाई शहरातील थोरात मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करत विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मराठासमन्वयकांनी ही माहिती दिली आहे.

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर... : जरांगे

धाराशिवच्या सभेनंतर ते बीडला सभेला पोहोचले. बीडमधील सभेतही त्यांनी खुर्चीवर बसूनच भाषण केलं आहे. या सभेवेळी उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले, 'छगन भुजबळ यांचं ऐकूण सरकार आपल्यावर अन्याय करेल असं वाटतंय. राज्य सरकारने अद्याप गुन्हे मागे घेतले नाहीत. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर सोपं नाही. मला माझ्या गोरगरीब समाजासाठी आरक्षण पाहिजे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकजूट फुटू देऊ नका : जरांगे

'तुम्ही एकजूट ठेवा, त्यांनी मला शत्रू मानलं तरी मी घाबरत नाही. मी मरायलाही घाबरत नाही. मी कुटुंबालाही मानत नाहीत. माझ्या समाजाला मी मायबाप मानलं आहे. मी समाजापेक्षा मोठं कुणालाही मानत नाही. तुमची एकजूट फुटू देऊ नका. मराठ्यांची एकजूट कुणी फोडू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला : जरांगे पाटील

'मला डॉक्टरांनी सांगितलं, पाटील तुम्ही 2 , 3 महिने अराम करा. किडनीवर सूज आहे. मात्र, मी थांबलो तर आता जवळ आलेलं आरक्षण मार्गी लागणार नाही. मला खूप वाईट वाटतंय. माझी मराठा समाजाला विनंती आहे, अशी संधी आपल्याला पुन्हा येणार नाही, असंही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT