Tuljabhavani Mandir
Tuljabhavani MandirSaam Tv

Tulja bhavani Mandir: आई तुळजाभवानीचं गहाळ झालेलं मुकुट सापडलं, नेमकं कुठे सापडलं?

Dharashiv News: आई तुळजाभवानीचं गहाळ झालेलं मुकुट सापडलं, नेमकं कुठे सापडलं?
Published on

>> बालाजी सुरवसे, धाराशिव! दि.11 डिसेंबर 2023

Dharashiv News:

धाराशिव येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीचं मुकूट हरवलं होतं. आता तुळजाभवानीचा गहाळ झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा दागिने मोजदाद समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय.

तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकूट सापल्याची माहिती मिळाली आहे. भक्तांनी दान केलेला 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब झाला असल्याचे मोजनी समितीच्या आवहालात सागण्यात आले होते. मात्र तोच मुकूट अता सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tuljabhavani Mandir
Shivraj Singh Chauhan: शिवराज सिंह चौहान यांचं आता काय होणार? मुख्यमंत्रिपद न मिळण्याची 'ही' आहेत कारणे

मिळालेल्या माहितीनुसार, 2009 ते 2023 या कालावधीत तुळजाभवानी देवीला भाविकांनी वाहिलेले सोने,चां दी आणि मौल्यवान वस्तूची मोजदाद काही दिवसांपूर्वी मंदिर संस्थान​कडून करण्यात आली होती. त्यामध्ये 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब असल्याचे निदर्शनास आले होते.  (Latest Marathi News)

त्यामध्ये 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र, 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब झाला होता. ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवण्यात आला असल्याचीही माहितीही मिळाली होती.

Tuljabhavani Mandir
Ashutosh Dumbare: ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; शहर पोलीस आयुक्तपदी आशितोष डुंबरेंची नियुक्ती, कशी आहे कारकिर्द

त्याबरोबर पुरातन खोडे (पादुका) काढून नव्या बसवण्यात आसल्याचे ही सांगण्यात आले होते. मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिकमोती सुद्धा गहाळ आहेत, अशी माहीती समोर आली होती. मात्र त्यापैकी आता 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com