Ashutosh Dumbare: ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; शहर पोलीस आयुक्तपदी आशितोष डुंबरेंची नियुक्ती, कशी आहे कारकिर्द

Ashutosh Dumbare: ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी आशितोष डुंबरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याचे सध्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांची महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Ashutosh Dumbare
Ashutosh DumbareGoogle
Published On

Thane city Police Commissioner:

ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल झाले आहेत. ठाणे शहराला नवे पोलीस आयुक्त मिळाले आहेत. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी आशितोष डुंबरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ठाण्याचे सध्याचे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांची महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य या पदी निवड करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कोण आहेत आशुतोष डुंबरे?

आशुतोष डुंबरे हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आशुतोष डुंबरे यांनी मुंबईच्या सह पोलीस आयुक्तपदही सांभाळलं आहे. तसेच राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य पदाचीही धुरा सांभाळली आहे. आज सोमवारी डुंबरे यांना ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्त केलं आहे.

डुंबरे हे राज्यात 'सुपर कॉप' म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरण हाताळले आहेत. त्याचबरोबर त्यांनी बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणही हाताळलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ashutosh Dumbare
Maharashtra ISIS Module: साकिब नाचन होता इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युलचा प्रमुख: NIAचा दावा

तत्पूर्वी, जयजीत सिंह यांची महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य पदाची धुरा दिली आहे. याआधी ठाणे शहर पोलीस आयुक्तपदाची धुरा जयजीत सिंह सांभाळत होते.

कोण आहेत जयजीत सिंह?

जयजीत सिंह १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांच्याकडे दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदाचीही धुरा सांभाळली आहे.

यासोबत मुंबई रेल्वे पोलीस अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम सांभाळलं आहे. तसेच त्यांना २०२१ मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदाची सूत्र हाती देण्यात आली होती .

Ashutosh Dumbare
Tulja bhavani Mandir: आई तुळजाभवानीचं गहाळ झालेलं मुकुट सापडलं, नेमकं कुठे सापडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com