Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे विधानसभेच्या आखाड्यात? 288 जागा लढवणार?

Maharashtra Assembly Election 2024: मनोज जरांगे पाटील हे सगे सोयऱ्याच्या कायद्यासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यातच ओबीसीतून मराठा आरक्षण आणि सगे-सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर विधानसभेला थेट नाव घेऊन पाडणार असल्याचा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी सगे-सोयऱ्याच्या कायद्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपोषणास्त्र उगारलंय. मराठा आरक्षण दिलं नाही तर आता नाव घेऊन पाडणार असल्याचा थेट इशाराच मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

मनोज-जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणूकीदरम्यान मराठा समाजानं प्रत्येक मतदारसंघात 500 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं. त्याचा थेट फटका महायुतीला बसला. आता जरांगेंनी थेट विधानसभेच्या आखाड्यातच उतरण्याचा इशारा दिलाय.

मराठा आरक्षण न दिल्यास 288 जागांवर उमेदवार देण्याचं त्यांनी जाहीर केलंय. मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, मराठा आरक्षण नाही दिलं तर मग विधानसभेच्या 288 जागांवर सगळ्या जातीधर्माचे उमेदवार देणार.

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणूकीत महायुतीला जोरदार फटका बसला. आता सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सरकारची पुन्हा एकदा कसोटी लागलीय.

जरांगेचा विश्वास मिळवण्यात सरकार अपयशी ठरलं तर महायुतीच्या आमदारांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं. त्यामुळे सरकार सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शमवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

Amruta Dhongade: किती सुंदर हास्य तुझे, गालावरची खळी ही लाजते

Cancer prevention tips: 3 पैकी १ कॅन्सर टाळता येतो! लाईफस्टाईलमध्ये ५ बदल वाचवू शकतात तुमचा जीव; तज्ज्ञांनी दिल्या टीप्स

Home Vastu: घरात देवघर करताना 'या' चुका टाळा, अन्यथा घरात येऊ शकेल संकट

Tanya Mittal: '१ रुपयांचं माचिस ६५ रुपयांना विकून झाले करोडपती...'; स्वतःच्या प्रेमात आंधळी तान्या मित्तल पुन्हा एकदा नको ते बरळली

SCROLL FOR NEXT