Manoj Jaranage Patil Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jaranage Patil : एसआयटी चौकशीच्या आदेशानंतर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला सर्वात जास्त फोन...

Manoj Jaranage Patil Reaction on SIT Inquiry : आंदोलनावेळी मला सर्वात जास्त फोन देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. तुम्ही माझ्यासोबत काय बोललात हे सगळं मी सांगणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

Ruchika Jadhav

Manoj Jaranage Patil :

देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी चालवणार हे मला आधिपासून माहिती होतं. जी चौकशी करायची ती करा. आंदोलनावेळी मला सर्वात जास्त फोन देवेंद्र फडणवीस यांचेच आले आहेत. तुम्ही माझ्यासोबत काय बोललात हे सगळं मी सांगणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून दोन्ही सभागृहांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस १०० टक्के सत्तेचा वापर करत आहेत. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. कारण मला माहितीये माझा कुठेच दोष नाही. मी प्रत्येक चौकशीला समोरा जाण्यासाठी तयार आहे. चौकशीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे जास्त कॉल रेकॉर्डींग असतील. त्यामुळे ते यात काय काय बोललात हे सर्वकाही समोर येईल, अशी प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे.

तुम्ही आता जरी चौकशीला सुरूवात केली तरी मी तयार आहे. हातला लावलेल्या सलाइन सकट मी चौकशीसाठी उभा राहिल, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी २ दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप केले. यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते.

जरांगेंच्या विधानांमागे कोण आहे? याची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. तर विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी केली. तसेच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी करण्यात यावी असं म्हटलं. त्यावर राहुल नार्वेकरांनी चौकशीचे आदेश दिल्याने जरांगेंनी देखील कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

Maharashtra Live News Update: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

SCROLL FOR NEXT