manoj jarange patil criticise pm modi over maratha reservation issue Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: PM मोदींना आता मराठ्यांची गरज राहिली नाही; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल, इशाराही दिला

Satish Daud

Maratha Reservation Latest News

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी शिर्डी दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन करत विरोधकांवर निशाणा देखील साधला. पण मोदींनी मराठा आरक्षणावर एकही शब्द काढला नाही, यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरीबांची जाण आहे असं वाटत होतं. पण ते मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाही. मोदींकडून आम्हाला खूपच आशा होती. पण, शेवटची आशाही कामाला आली नाही. त्यामुळे मोदींबद्दल असणारा गैरसमज आमच्या मनातून निघून गेला आहे. त्यांना मराठा समाजाची गरज राहिली नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

दरम्यान, आता मराठे लढायला सज्ज झाले आहेत. आता आम्ही लढूनच आरक्षण मिळवू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आम्ही कुठल्याही पुढाऱ्यांना गावबंदी घातली नाही. आम्ही एवढंच म्हणालो, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही आमच्या गावात यायचं नाही, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्हाला बाकी आरक्षणाच्या भानगडीत पाडायचं नाही, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि विषय संपवा, असं देखील जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाज हक्काच्या आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करीत आहे.

पण, काही लोक त्यांच्या विरोधात विद्वेष पसरविण्याचे काम करीत आहे. मुंबईत गाड्या फोडल्याची घटना मला ठावूक नाही. अशा घटनांचं मी समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांवरील तोडफोडीच्या घटनेवर दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Maharashtra News Live Updates : पुण्यात उद्या नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारने आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

SCROLL FOR NEXT