Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं ठिकाण बदललं; काय आहे कारण?

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. उद्यापासून ते आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसणार होते. परंतु त्यांनी उपोषणाची तारीख बदललीय. आता अंतरावली सराटी येथे ते उपोषण करणार होते, आता याबाबत नवी माहिती समोर आलीय. जरांगे पाटील यांनी उपोषणाचं ठिकाण बदललं आहे, हा निर्णय त्यांना का घेतला, याचं कारण त्यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत मोठी अपडेट समोर आलीय. मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचं ठिकाण बदललं आहे. आपलं अंतरवाली सराटीमध्ये मनात लागत नसल्याचं म्हणत त्यांनी उपोषणाचं ठिकाण बदललं आहे. जरांगे पाटील आधी उपोषण सुरू करण्याची तारीख बदलली आता ठिकाण बदललं आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, हे जाणून घेऊ.

मनोज जरांगे पाटील यांना अंतरावली सराटीमध्ये उद्या ४ जूनला करण्यात येणारे आमरण उपोषण ८ तारखेला करणार असल्याचं सांगितलं. आचार संहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात अजून एक मोठी अपडेट समोर आलीय. जरांगे पाटील हे अंतरावली सराटी येथे उपोषण करणारच नसल्याचं म्हटलंय. अंतरावली सराटी येथे आपलं मन लागत नसल्याचं ते म्हणाले.

अंतरावली सराटी हे गाव खूप चांगलं आहे,परंतु आंदोलनामुळे गावाला आणि गावकऱ्यांना त्रास होईल, यामुळे आपण तेथे आता उपोषण करणार नसल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी फेसबूक पोस्ट करत दिलीय. गाव चांगले आहे, गाव अडचणीत येऊ नये,ही आपली भूमिका आहे, त्यामुळे त्या गावात आमरण उपोषण आंदोलन करण्यासाठी आपलं मत लागत नाहीये. आता उपोषण आंदोलन कुठे करावे हे समाज बांधवांशी बोलून ठरवलं जाईल, अशी माहितीही जरांगे पाटील यांनी दिली.

आंदोलन होऊ न देण्यासाठी आणि समाजाचं भलं होऊ न देण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. ज्याला मराठा समाजाचे भले करू द्यायचे नाही तो स्वत:ची वाहन फोडेल. तोडफोड करेल. मग सरकार पुन्हा एकदा षडयंत्र करेल आणि पुन्हा त्या गावातील गावकऱ्यांवर लाठीचार्ज करेल. गावाला कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आणलं जाईल.

कोणी एखादा काहीतरी बोलेल मग त्याला कोणी बोललं की, हिंसाचार केला जाईल, त्या व्यक्तीला सरकारचा पाठिंबा असेल. त्याच्या पाठीमागून सरकार गावकऱ्यांना वेठीस धरेल, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. सरकारवरही आरोप करताना त्यांना पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन महिन्यापूर्वी कशेडी घाटात तिघांनी संपवलं, मृतदेहाचं गुढ उकललं; रायगडमधील 'त्या' हत्येचं धक्कादायक कारण

Mira Bhayandar : मारहाणीनंतर जीवे मारण्याचा धमक्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काय घडलं? मिरारोडमधील मनसैनिकाने सगळंच सांगितलं

Mira Bhayandar Protest: मीरा-भाईंदर मोर्चा का निघाला? अविनाश जाधव यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला | VIDEO

Divorce: '३ दिवस एकच अंडरवेअर घालतोस, आंघोळ करत नाहीस...मला काडीमोड हवाय' पत्नीचं डिव्हॉर्स लेटर व्हायरल

Pune Crime : मटण, दारू पार्टीसाठी पैसे नव्हते; आखला खतरनाक प्लॅन, एका चुकीने मात्र सापडले पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT