मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मनोज जरांगे उद्या एकटेच मुंबईला जाणार
मनोज जरांगेंनी मुंबई आंदोलनाचा सांगितला पुढचा प्लान
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केला गंभीर आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी उद्या मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या मोर्चात मोठा बदल केला. मनोज जरांगे उद्या सकाळी आपल्या समर्थकांसह मुंबईला येणार होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचे सांगितले. त्यांनी मी उद्या एकटाच मुंबईला जाणार असून कुणीही माझ्यासोबत येऊ नका असे सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. फडणवीसांनी सणासुदीच्या आडून डाव टाकला. पण मी फडणवीसांच्या तोडीस तोड डाव टाकणार असल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, 'उद्या आपण सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही. ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जायचं आहे.माझ्या सोबत 2 अँबुलनस असतील 10 माणसांपेक्षा माझ्या सोबत कुणीही असणार नाही.सलाईन, पाणी सोडल्याने आता त्रास होतोय. मी एका मुंबईला जातोय मुंख्यमंत्री मला आता परवानगी देणार का?उद्या जाताना एकटाच एका गाडीने मुंबईला जाणार आहे. मराठ्यांची खिंड आता मी एकटा लढवणार आहे. एकटा मुंबईला चाललो आहे आता कोण आडवतोय ते मी बघतो.'
मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या आडून मराठ्यांवर डाव टाकला. मराठे मुंबईत येणार आणि धिंगाणा घालणार मग दंगल घडणार. आपल्या रॅलीत घुसून दंगल घडवण्याचा त्यांचा डाव होता. देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो.परवानगी नाकारली ना मग फडणवीस मला एकट्याला परवानगी देणार की नाही? आझाद मैदानांवर आता मला परवानगी देणार का? मी एकटा आधी खिंड लढवतो आधी एकटा मी मुंबईत जातो. समाजाने येऊ नये असं नाही वर्गणी करून केलेल्या गाड्या तशाच ठेवा पैसे खर्च करू नका.'
मला कोण अडवतं ते मी पाहतो असे म्हणत जरांगेंनी सरकारला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, 'मुंबईत मराठा समाजाला योग्य वेळी बोलावलं जाईल. तुम्ही तुमच्या गावात सावध आणि सुरक्षित राहा. मराठा समाजाने आता नाराज होऊ नये. वेळप्रसंगी निर्णय बदलावे लागतात. निर्णय फक्त तुम्ही येण्याचा बदलला आहे. फडणवीस यांना डाव टाकून मराठ्यांना जिंकवावं लागेल, सण उत्सव आहेत. सगळं सैन्य कधीच एका दिवशी गेलेलं नाही. काही घात झाला तर मी एकटा मुंबईत जातो. मला कोण अडवतो कोण परवानगी नाकारतो ते बघतो. मराठ्यांची तिथे गर्दी होणार म्हणून तुम्ही परवानगी नाकारली ना? आता मी एकटा येतो. आता आम्ही सरकार आणि न्यायदेवतेचा सन्मान होणार की नाही?'
मुंबईला एकटं जाण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण मनोज जरांगे यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'मुक्कामाचे ठिकाण कायम राहील, मुक्कामाच्या ठरलेल्या ठिकाणी अंतरवालीच्या उपोषणासारखं ठिकाण तयार करा. मी तिथेच उपोषण करीन. प्रत्येक ठिकाणी अशीच व्यवस्था ठेवा. कुठेही हार तुरे ठेऊ नका. मराठा समाजाने फक्त लक्ष ठेवायचं आहे. हे उपोषण सुरूच राहणार आहे. मार्ग ठरला आहे त्याच मार्गाने मुंबईला जायचं आहे. समर्थकांनी उद्या मुंबईला येऊ नये. मराठ्यांनो योग्य वेळी तुम्हाला मुंबईत बोलावेन. तुम्ही लावलेल्या गाड्या वाया जाणार नाही. योग्य वेळी मुंबईला बोलावेल. मराठ्यांनो गावात सुरक्षित आणि सावध राहा. आता ही झुंज शेवटची आहे. जीव गेला तरी स्वाभिमानाला धक्का लागणार नाही. आता घाई गडबड करायची नाही. तुम्ही केलेली तयारी वाया जाणार नाही. मी मागे हटलेलो नाही, एकटा मुंबईला जाणार. तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला.मराठ्यांची खिंड आता एकटा लढणार आहे. मी शरण जाणार नाही.'