Manoj Jarange Patil Dasara Melava  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठ्यांचं वादळ नारायण गडावर धडकलं; जरांगेंच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी जमली, पाहा VIDEO

Manoj Jarange Patil Dasara Melava : मराठवाडा तसेच विदर्भातून अनेक मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही जणांनी तर पहाटेपासूनच नारायण गडावर तंबू ठोकला आहे.

Satish Daud

बीड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचं राजकीय वातावरण आणखीच तापण्याची चिन्हे आहे. कारण, आज राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ६ दसरा मेळावे होणार आहेत. यात मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्याचा देखील समावेश असून ते नारायण गडावरुन मराठा बांधवांना संबोधित करणार आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे भगवान गडावरून ओबीसी बांधवांना संबोधित करतील. दरम्यान, जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पहाटेपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे.

मराठवाडा तसेच विदर्भातून अनेक मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही जणांनी तर पहाटेपासूनच नारायण गडावर तंबू ठोकला आहे. तब्बल ९०० एकरामध्ये हा मेळावा होणार असून २०० एकरमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्याला येणाऱ्या मराठा बांधवांसाठी चहा आणि नाष्ट्याची सोय देखील करण्यात आली आहे. नारायण गडाकडे येणाऱ्या मराठ्यांनी शांततेत यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. सगेसोयरेंची अधिसूचना लागू करून सरकारने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे यांनी अनेकदा उपोषण देखील केलंय. मात्र, सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० आरक्षण दिलं आहे. त्यांनी आतापर्यंत जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा उपोषण केलं होतं. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करा, अन्यथा विधानसभेत अनेक उमेदवारांना पाडणार, अशाचा इशाराच जरांगे यांनी दिला होता. मात्र, सरकारने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं. अखेर तब्येत खालावल्याने जरांगे यांना आपलं उपोषण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेण्याचं जाहीर केलं.

या मेळाव्यात मराठा समाज आगामी विधानसभेसाठी आपली भूमिका स्पष्ट करणार, असं जरांगे म्हणाले होते. आज नारायण गडावर दुपारी १ वाजेच्या सुमारास जरांगे यांचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी मराठा बांधवांनी पहाटेपासून बीडकडे कूच केली आहे. आतापर्यंत हजारो मराठा बांधव नारायण गडावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मेळाव्याला सुरुवात होणार आहे. या मेळाव्याला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT