Manoj Jarange Patil  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil regret : मनोज जरांगे यांनी व्यक्त केली दिलगिरी; देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले होते अपशब्द

Jarange Patil Apologized : मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Maratha Reservation News :

राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्दयावरून दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर गंभीर आरोप करत अक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्याबाबत आता जरांगेंनी दिलगीरी व्यक्त केली आहे. बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, आज आर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने सत्ताधारी नेते आक्रमक झाले होते. विधानसभेत आमदार आशिष शेलार, विधानपरिषदेत प्रवीण दरेकर, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील याबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी या सर्वांवर दिलगीरी व्यक्त केलीये.

माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, "उपोषणामुळे माझी तब्येत ठिक नव्हती. त्यामुळे अनावधानाने माझ्याकडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो."

सोळा-सतरा दिवस माझ्या पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. मी माझ्या माता माऊलीला मानतो. जर माझ्याकडून चुकीचे शब्द गेले असतील तर मी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. कारण चुक झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणं म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

पुढे एसआयटी चौकशीवर बोलताना त्यांनी म्हटलं, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मी हटू शकत नाही आणि हटणारही नाही. त्यांना काय चौकशा करायच्या असतील त्यांनी त्या बिनधास्त कराव्या. एसआयटीची चौकशी सुद्धा बिनधास्तपणे चालू द्यावी, त्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याच आहेत. त्यांना त्या कशा चालवायच्या आहेत, काय धाक दाखवायचेत ते दाखवा. मात्र मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये जायला आणि लढायला तयार आहे, अशा शब्दांत जरांगें पाटलांनी ठामपणे आपली भूमिका मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT