Manoj Jarange Patil Accusation Yandex
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र? मराठ्यांच्या रॅलीत दगडफेकीचा कट; जरांगेंचा भाजपवर खळबळजनक आरोप

Manoj Jarange Patil Accusation : मनोज जरांगे पाटलांनी मराठवाड्यानंतर आपलं लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रीत केलंय. दरम्यान भाजप आणि जरांगेंमधील संघर्ष अधिक तीव्र होत असतानाच आता भाजप षडयंत्र रचत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंनी सगे सोयरे आरक्षणासाठी जनजागृती रॅलीला सुरुवात केलीय. मात्र या रॅल्या उधळून लावल्य़ालं षडयंत्र केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगेंनी केलाय. मराठा समाजाचा संयम तोडण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून दगडफेक घडवून आणली जाऊ शकते, असा आरोप करून जरांगेंनी पुन्हा खळबळ उडवून दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून जरांगे फडणवीसांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकरांसह, प्रसाद लाड, नारायण राणेंनी मनोज जरांगेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरुवात केलीय. त्यामुळे जरांगे विरुद्ध भाजप नेते असाच सामना रंगलाय. त्यातच फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडत असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. तर विखेंनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जरांगेंनी मराठवाड्यानंतर शांतता रॅलीचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय. त्याची सुरुवात सोलापूरमधून करण्यात आलीय. तर पुण्यात या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेचा मार्ग कसा आहे ते पाहूयात

शांतता रॅलीचा दुसरा टप्पा

7 ऑगस्ट सोलापूर

8 ऑगस्ट सांगली

9 ऑगस्ट कोल्हापूर.

10 ऑगस्ट सातारा

11 ऑगस्ट पुणे

12 ऑगस्ट अहमदनगर

13 ऑगस्ट ला नाशिक येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा भाजपला मोठा फटका बसला होता. आता जरांगेंनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जरांगेंच्या निशाण्यावर भाजपचं असल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजप जरांगेविरोधात आक्रमक भूमिका घेणार की दुसरी रणनीती आखणार याबाबत उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT