VIDEO : भला मोठा हार, स्वागत, सन्मान...पाटील पाटील नावाच्या घोषणा, सोलापुरात मनोज जरांगे यांचे स्वागत

Manoj Jarange patil Shantata Rally in Solapur : मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सोलापुरात सुरुवात झाली. यावेळी त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सोलापुरातून सुरुवात झाली आहे. सोलापूरच्या या रॅलीला कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. याच गर्दीतून पाटील, पाटील असा त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात होत्या.

यावेळी मराठा बांधवांनी वारकरी फेटा घालून जरांगे पाटील यांचा सन्मान केला. तसेच त्यांना भलामोठा हार घालून स्वागत केलं. यावेळी मनोज जरांगेंनी मराठा बांधवांचे कौतुक केले. सोलापूर जिल्ह्यातील मराठा बांधवांनीही राज्याला दाखवून दिले की आम्ही कोणापेक्षा कमी नाही. कितीही मुसळधार पाऊस येऊ द्या मी येथून हलणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

आता २०२४ मध्ये कोणाला बसवायचं हे मराठ्यांनी ठरवायचे आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांना एकप्रकारे आव्हान दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com