आज मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवशेनात मराठा आरक्षणाविषयी निवेदन सादर केलं. या निवेदनात मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षणावर फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवदेनानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. 'आम्हाला सरकारची पुढची डेडलाइन मान्य नाही, फेब्रुवारीपर्यंत थांबणार नाही, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. (Latest Marathi News)
मनोज जरांगे यांनी विधानसभेतील अधिवेशनानंतर माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, 'ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आणखी दोन शब्द वापरायला हवे होते. त्यांनी ते वापरले नाहीत. त्यांनी १९६७ च्या पुरव्याचा उल्लेख केला आहे. आतापर्यंत ५४ लाख लोकांना कुणबी नोंदी सापडल्या आहेत'.
'मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, मागासवर्ग आयोगाचा अहवाल येणार आहे. तो केव्हा येणार हे माहीत नाही. ती आमची मागणी नाही. त्यात खूप शंका आहेत. ते टिकलं की नाही? याबाबत शंका आहे. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली जाईल का? दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल का? असे अनेक प्रश्न आहेत, असे जरांगे म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'पन्नास टक्क्यांवर जाणारं आरक्षण टिकणारं नाही. तुम्ही २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या. याची आम्ही वाट पाहत आहे. पुढची डेडलाइन मान्य नाही. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास आंदोलन आम्ही पुकारणार आहोत. आंदोलनाची दिशा २३ तारखेला स्पष्ट करू, असेही ते म्हणाले.
'मराठा समाजाला लाभ कसा मिळणार त्यांनी सांगावं. रक्ताच्या नात्यातील लोकांना कसा लाभ देणार हेही सरकारने सांगावं. याबाबत कायदा करणार का, हे 23 तारखेच्या दुपारपर्यंत सांगावं अन्यथा आम्हला पुढची दिशा स्पष्ट करावी लागेल, असेही ते म्हणाले.
'मुख्यमंत्री शिंदे यांनी काही शब्द स्पष्टपणे सांगितलं नाही. सरकारला स्पष्ट सांगावे लागणार आहे. रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांना लाभ देणार आहे का, नातलग सिद्ध करण्यासाठी काय अटी ठेवणार ही भूमिका सांगावी लागणार. तसेच किती दिवसांनंतर लाभ देणार हेही सांगावं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर खुश आहे आणि नाही सुद्धा, असे जरांगे पुढे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.