Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

मनोज जरांगेना पोलिसांकडून जालना-मुंबई मोर्चाला परवानगी; पण ४० अटींच पत्र, नेमकं काय काय?

Maratha Reservation Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना. जालना पोलिसांनी 40 अटींसह मोर्चाला परवानगी दिली. मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलनासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक केली.

Bhagyashree Kamble

  • मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा मुंबईकडे रवाना.

  • जालना पोलिसांनी 40 अटींसह मोर्चाला परवानगी दिली.

  • मुंबई उच्च न्यायालयानं आंदोलनासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक केली.

  • आझाद मैदानावर आंदोलन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा विडा उचलला आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्यातील अंतरवाली सराटी येथून सकाळी मराठा मोर्चानं मुंबईकडे कूच केला आहे. मात्र, जरांगे यांना जालना पोलिसांनी अटींसह परवानगी दिली असून, एकूण ४० अटींचे त्यांना पत्र देण्यात आलंय.

जरांगे पाटलांचा मोर्चा जालना, जुन्नर, राजगुरूनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, चेंबूर असा प्रवास करीत २८ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात पोहोचणार आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी एक महत्वपूर्ण आदेश दिला आहे. पुढील २ आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही आंदोलन करता येणार नाही आहे, असे थेट निर्देश उच्च न्यायालयानं दिले.

त्यामुळे जरांगे पाटलांची कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील विनोद पोखरकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर न्यायालय आम्हाला आंदोलन करण्यास परवानगी देईल, असं पोखरकर म्हणाले. जरांगे पाटलांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेनं वळवला खरा, पण पुढील तासांत काय घडतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे यांना जालना पोलिसांनी काही अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. जालना पोलिसांकडून जरांगे पाटलांना ४० अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे.

जालना पोलिसांच्या महत्वाच्या अटी:

प्रवासादरम्यान आक्षेपार्ह घोषणा किंवा जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होऊ नयेत.

मोर्चाचा मार्ग जाहीर केल्याप्रमाणेच राहील, नंतर बदलता येणार नाही.

अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आदी सेवांना अडथळा निर्माण होणार नाही.

मोर्चादरम्यान सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास भरपाई आयोजकांकडून होईल.

नागरिकांनी हातात कोणतेही शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज किंवा ज्वलनशील पदार्थ ठेवू नयेत.

यासह एकूण प्रमुख ४० अटी.

दरम्यान, आंतरवाली सराटी येथे मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झाला असून जय्यत तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहातच आता मराठा आरक्षणाचा लढा उग्र होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Devices: IPhone 17 लॉंच होताच, बंद होणार अ‍ॅप्पलचे 'हे' डिव्हाईस

पठाणकोटमध्ये २५ जवानांना कसं वाचवलं; अंगावर शहारे आणणारं रेस्क्यू ऑपरेशन | VIDEO

Shocking: भयंकर! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला पाईपचा तुकडा; एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरही चक्रावले

Horoscope Thursday : ५ राशींच्या वाटेतली विघ्न दूर होणार, स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार; वाचा गुरुवारचे खास राशीभविष्य

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग बाईकचा थरार

SCROLL FOR NEXT