Manoj Jarange Issues Ultimatum to CM Devendra Fadnavis : उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती खालावलेली, चेहरा पूर्णपणे सुकलेला, अंगात त्राण नाही, बोलताही येईना...मराठा समाज आरक्षणाच्या मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून, आपल्या मागण्यांवर ते ठाम आहेत. याच अवस्थेत त्यांनी उपोषणस्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे.
आमच्या ज्या सात - आठ मागण्या आहेत, त्या मान्य करायच्या आहेत की नाहीत, त्यांची अंमलबजावणी करायची आहे की नाही याबाबत स्पष्टपणे सांगावे. तु्म्ही अंमलबजावणी करणार नसाल तर आम्हाला वेगळ्या मार्गानं आंदोलन करावं लागेल, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे.
मराठा समाज आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा म्हणजे बुधवारचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याचे दिसून येते. याच अवस्थेत त्यांनी समर्थक आणि माध्यमांशी संवाद साधला. आमच्या मागण्या मान्य करायच्या आहेत का? हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे. मागण्यांची अंमलबजावणी करणार आहात की नाही. तुम्ही करणार नसाल तर आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला लागेल, अशी ठाम भूमिका मनोज जरांगेंनी मांडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात एक - दोन तासांत भूमिका जाहीर करावी. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार की नाही हे आज संध्याकाळपर्यंत सांगून टाकावे, असेही ते म्हणाले.
आमच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन शब्दांत आपली भूमिका सांगायला हवी. आमच्या आठ ते नऊ मागण्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत की नाहीत. हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. कारण अनेक लोक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. आमच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करावं लागेल, असा इशारा यावेळी जरांगेंनी दिला.
आम्हाला उपोषणाला पुन्हा बसावं लागेल किंवा अशी वेळ पुन्हा येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. मला यावर आता जास्त काही बोलायचं नाही. अंमलबजावणी करणार की नाही? हो किंवा नाही फक्त एवढंच मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे. तुमची भूमिका एक-दोन तासांत स्पष्ट करावी, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी सरकारला अल्टिमेटम दिला. दरम्यान, उपोषणस्थळावरून जरांगेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर उपस्थित समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.