Manoj Jarange, Chhagan Bhujbal, and Eknath Shinde clash over Maratha reservation — OBC vs Maratha tensions escalate in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा समाज अधिकृत ओबीसीत, भुजबळांच्या विरोधावर जरांगेंचा पलटवार

Chhagan Bhujbal Warns Legal Action Against Maratha Reservation GR: मराठा समाज अधिकृत ओबीसीत आलाय, असा दावा मनोज जरांगेंनी केलाय.. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसीत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे... मात्र उपमुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंच्या दाव्यातील हवाच काढून घेतलीय... नेमकं शिंदे काय म्हणाले आहेत?

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर राज्यभर ओबीसींनी एल्गार पुकारलाय.. मात्र जीआरमुळे मराठा समाज अधिकृतरित्या ओबीसीत आल्याचा दावाच करत जरांगेंनी ओबीसींना डिवचलंय.. मात्र या वादाला कारण ठरलंय भुजबळांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात जीआरविरोधात कोर्टात जाण्याचा केलेला निर्धार....

भुजबळांनी जीआर विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगेंनीही भुजबळांना प्रतिआव्हान दिलंय.. सरसकट मराठा ओबीसीत गेलाय.. मात्र भुजबळ कोर्टात गेले तर थेट मंडल आयोगच चॅलेंज होईल, असा इशारा जरांगेंनी दिलाय...

हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरुन ओबीसी विरुद्ध मराठा आमने-सामने आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात जरांगेंच्या दाव्यातील हवाच काढून घेतलीय.. जीआरमुळे सरसकट आरक्षण मिळणार नसल्याचच शिंदेंनी स्पष्ट केलंय...

सरकारने मनोज जरांगेंना मराठा आणि कुणबी एकच असल्याच्या पुराव्याबाबत दिलेला शब्द तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचा उद्रेक आणि भुजबळांनी सरकारला कोर्टात खेचण्याचा दिलेला इशारा... यामुळे सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे... त्यामुळे सरकार जरांगेंना दिलेला शब्द पाळण्यासाठी कोर्टात प्रयत्नांची बाजी लावणार की ओबीसींच्या हक्काचं रक्षण करणार... याकडे राज्याचं लक्ष लागलंय... या आरक्षणाच्या लढाईतून गावागावात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष आणखी तीव्र होत जाणार... हे मात्र नक्की....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMAY: पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार? सरकारने दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक

Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT