Manoj Jarange Alilgations Eknath Shinde  AI Image
महाराष्ट्र

Manoj Jarange: शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी घेतले, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा; म्हणाले - 'माझ्याकडे पुरावे...'

Manoj Jarange Alilgations Eknath Shinde: मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे.

Priya More
  • मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला गंभीर आरोप

  • शिंदेनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला

  • नारायणगडावरील दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंचे मोठे विधान

'शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले', असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांचा बीडमधील नारायण गडावर दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिंदेंनी भाजपकडून ५०० कोटी घेतले असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा देखील दावा त्यांनी केला. मनोज जरांगेंच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर आरोप करताना सांगितले की, 'मी उपोषणाला बसल्यानंतर ७ ते ८ दिवसांनी मला एक गोष्ट कळाली. ती गोष्ट लय भयंकर होती. मी आज फक्त उत्तर मागत आहे ते पण एकनाथजी शिंदेसाहेबांना. आजच्या दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही उत्तर द्या. शिंदेसाहेबांनी भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल असे सांगितले आहे का की जरांगे पाटलांना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत आणि तुम्ही भाजपकडून ५०० कोटी रुपये घेऊन जरांगे यांना दिले आहेत असे तुम्ही सांगितले आहे का? भाजपची अंतर्गत चर्चा सुरू आहे.'

त्यांनी पुढे सांगितले की, 'जो काही पुरावा सापडेल तो मी तुमच्या पुढे टाकणार आहे. शिंदेसाहेब खोटं बोलले की भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि मला दिले. शिंदेसाहेब हे जर खोटं असेल तर हे दिलखुलास सांगावं. हा लहान विषय नाही. तुमचा आमचा सामना नंतर होईल. मी जातवान आहे. भाजप असं सांगून तुम्हाला संपवत आहे का की तुम्ही मला संपत आहात. याच्यामध्ये खूप मोठा कट आहे. हा जो काही पुरावा माझ्याकडे आहे तो सांगून तुमच्या पायाखालची माती सरकेल. '

तसंच, 'मला जर ५०० कोटी रुपये दिले असतील तर ते सिद्ध करून दाखवतील आणि नाही दिले तर याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही भाजपाच्या नेत्याला खोटं बोलून ५०० कोटी रुपये आणले आहेत का? आणि का आणले? उद्या संध्याकाळपर्यंत तुम्ही याचे उत्तर द्या नाहीतर मी याच्या मुळाशी जाणार आहे.', असे म्हणत मनोज जरांगे संतापले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2026 : दिवाळीपूर्वी घरातून 'या' ५ वस्तू काढून टाका; गरिबी होईल दूर अन् कायम राहील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Mumbai : नवरात्रीच्या गरब्यात भंयकर घडलं! दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Green vs Golden Kiwi : हिरवी की गोल्डन? कोणत्या किवीमध्ये असतं जास्त प्रोटीन? वाचून व्हाल थक्क

Peanuts Benefits: दररोज भुईमुगाचे दाणे खाल्ले तर काय होतं?

Maharashtra News Live Update: मीरा रोडमध्ये गरबा खेळताना काळाचा घाला; ३० वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT