Manoj Jarange warns Dhananjay Munde Those with blood on their hands should stay away from me. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: रक्ताने हात माखलेल्यांनी बोलू नये, धनंजय मुंडेंना जरांगेंचा इशारा

Munde vs Jarange Clash: धनंजय मुंडेंचे हात रक्ताने माखलेत असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी केलाय... मात्र या वादाची ठिणगी पडण्याचं कारण काय? जरांगे धनंजय मुंडेंविरोधात इतके आक्रमक का झालेत? धनंजय मुंडेंचं कोणतं वक्तव्य जरांगेंच्या जिव्हारी लागलंय?

Bharat Mohalkar

ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. त्यांनी माझ्या लागू नका, म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलाय...या वादाला सुरुवात झाली ती भगवान भक्तीगडावरच्या दसरा मेळाव्यात मुंडेंनी जरांगेंचं नाव न घेता केलेला हल्लाबोल... आधी धनंजय मुंडेंनी एमपीएससीतील कटऑफचा दाखला देत मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा दावा केला.. हे कमी होतं की काय? पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे जरांगेंचा रक्तबीज नावाचा जातीयवादी राक्षस असा अप्रत्यक्ष उल्लेख करत धारदार हल्लाबोल केला.. त्यावरुन जरांगे आक्रमक झालेत...

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक हाच मास्टरमाईंड असल्याचं तपासात समोर आलंय.. तोच धागा पकडून जरांगेंनी मुंडेंचा उल्लेख रक्ताने हात माखलेले असा केलाय.. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी आरक्षणावरुन पेटलेला मुंडे विरुद्ध जरांगे वाद आता दसरा मेळाव्यातील विखारी टीकेनंतर आणखी टोकाला जाणार हे निश्चित आहे...

त्यामुळे या वादाचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार हे आता स्पष्ट झालंय.. मात्र निवडणुकीआधीच्या विखारी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार? यावर मराठवाड्यातील सामाजिक वीण उसवणार की कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT