स्वतःला बाळूमामांचा 'अवतार' म्हणवून घेणारा आणि 27 एकरात आलिशान मठ उभारणारा भोंदू मनोहर भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येतायत.....अशातच भोंदू मनोहर भोसलेचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्यातील अनेक राजकीय नेते त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याचं समोर आलंयं...करमाळ्याच्या घोटी गावातील मनोहर भोसलेचा आश्रम सील झाल्यानंतर तिथल्या सरपंचानं हा धक्कादायक खुलासा केलाय...
दरम्यान भोंदू मनोहर भोसले आपल्या याचं आश्रमातील एक पेरू दोन हजार रुपयांना आणि एक डझन आंबे 3 हजारांना प्रसाद म्हणून विकत असल्याचा ही आरोप आहे... याचं प्रसादाच्या माध्यमातून भाविकांकडून कोट्यवधी रुपये उकळण्याचे काम भोसले करत होता, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय..
भोंदू मनोहर भोसलेच्या दरबारात हजर राहायचं असेल तर 51 हजार रुपये मोजावे लागायचे. अडथळे दूर करणे, व्यवसायात भरभराट आणि राजकीय पद मिळवून देण्याच्या नावाखाली तो भक्तांकडून लाखो रुपये उकळायचा... काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या दरबाराच्या नियोजनासाठी त्याला मदत करत असल्याचीही सूत्रांकडून माहिती समोर आलीय..बारामतीतील तरुणाकडून 'थायरॉईड कॅन्सर' बाभळीच्या पाल्याने बरा करतो, अशी थाप मारून अडीच लाख उकळले...महिला भाविकावर बलात्कार केल्याचाही गुन्हाही करमाळ्यात दाखल झाला आहे.अमावास्येला घोटी आश्रमात येणाऱ्या भक्तांकडून
पार्किंगसाठी प्रत्येकी 200 ते 300 रुपये आकारले जायचे..एवढंच नाही तर घोटीजवळील शेतकऱ्यांच्या पाझर तलावाच्या 3 ते 5 एकर जमिनीवर अतिक्रमण करून भोसलेने स्वतःच्या आश्रमातील शेतात शेततळे करून शेतकऱ्यांचे पाणी पळवले...
दरम्यान अमावस्या आणि पौर्णिमेला ज्याच्या दर्शनासाठी नेत्यांच्या रांगा लागायच्या, तो भोंदू मनोहर भोसले आता पोलिसांच्या ताब्यात आहे..पण प्रश्न उरतो की, महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना जबाबदार लोकप्रतिनिधी अशा भोंदूंच्या आहारी जात असतील, तर दाद नेमकी कुणाकडे मागायची? भोंदूबाबांकडून भक्तांची होणारी आर्थिक फसवणुक आणि बेकायदेशीर बांधकामांच्या माध्यमातून मनोहर भोसलेनं उभारलेलं हे काळं साम्राज्य आता ढासळायला लागलं असलं तरी हे साम्राज्य उभारण्यासाठी त्याला कोणी राजाश्रय दिला, हे समोर येणं गरजेचं आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.