Haunted Fort : रहस्यमय घटना अन् भयानक आवाज, 'या' किल्ल्यावर दिवसा देखील जाण्यास घाबरतात लोक

Shreya Maskar

भुताटकीचा किल्ला

भारतातील राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातील राजगड तालुक्यात, सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर भानगड किल्ला वसलेला आहे. हा भारतातील सर्वात जास्त भयानक किल्ला आहे.

Haunted Fort | google

भानगड किल्ला

भानगड किल्ल्याचे गूढ हे तिथल्या भयानक शाप आणि भूतांच्या अस्तित्वाबाबतच्या स्थानिक दंतकथांवरून निर्माण झाले आहे; या कथांचा विरोधाभास दुष्काळ, युद्ध आणि वन्यप्राण्यांचा धोका यांसारख्या ऐतिहासिक वास्तवांशी दिसून येतो.

Bhangarh Fort | google

दंतकथा

मांत्रिक आणि राजकुमारी शापांशी संबंधित दंतकथा येथे ऐकायला मिळते. तसेच रात्रीचे किल्ल्यातून भयानक आवाज ऐकू येतात. तसेच स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार येथे अनेक रहस्यमय घटना घडल्या आहेत.

legend | google

रात्री प्रवेशाचे नियम

भानगड किल्ल्यावर जायला दिवसाही पर्यटक घाबरतात. तसेच येथे सूर्यास्तानंतर किल्ल्यात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी येथे प्राणीही फिरतात.

Night Entry Rules | google

किल्ला कोणी बांधला?

भानगड किल्ला १५७३ मध्ये आंबेरचे कछवाहा शासक राजा भगवंत दास यांनी आपला धाकटा मुलगा माधो सिंग (प्रथम) याच्यासाठी बांधला होता.

Who built the fort? | google

कसं जाल?

मुंबईहून (मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे) जयपूर जंक्शनसाठी थेट ट्रेनने प्रवास करा. या प्रवासासाठी साधारणपणे १७ ते २० तास लागतात. त्यानंतर जयपूरवरून दौसा रेल्वे स्टेशनपर्यंत लोकल ट्रेन किंवा बसने जा.

how do you go | google

जवळचे स्टेशन

दौसा रेल्वे स्टेशनपासून रिक्षाने तुम्ही भानगड किल्ल्याला पोहचाल. किंवा तुम्ही थेट जयपूर स्टेशनपासूनही बाय रोड टॅक्सी, बस, रिक्षाने किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.

Nearest station | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Alibaug Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...