Shreya Maskar
सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात उपवासाला २५-३० मिनिटांत बनवता येईल अशी फराळ थाळीची रेसिपी जाणून घेऊयात.
दही आलूमध्ये उकडलेले बटाटे दह्यापासून बनवलेल्या घट्ट ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. ही ग्रेव्ही कुट्टूच्या पिठाने हलकी घट्ट केली जाते आणि उपवासाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सैंधव मीठ, इतर मसाल्यांनी चवदार बनवली जाते. दही आलूची भाजी कुट्टूच्या पुऱ्यांसोबत खाल्ली जाते.
उकडलेल्या बटाट्यांमध्ये कुट्टूचे पीठ मिक्स करून मऊ कणिक मळून कुट्टूच्या पुऱ्या बनवल्या जातात. तळल्यावर ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होते.
उपवासाला साबुदाणा खिचडी हा लोकप्रिय पदार्थ बनवला जातो. यामध्ये भिजवलेला साबुदाणा, भाजलेल्या शेंगदाण्याची पूड, उकडलेले बटाटे, जिरे, हिरव्या मिरच्या आणि तूप टाकले जाते. शेवटी, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून त्याची चव वाढवली जाते. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
उपवासाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर मखाना खीर हा उत्तम पर्याय राहील. भाजलेले मखाने मंद आचेवर दुधात शिजवले जातात आणि त्यात साखर, वेलची आणि सुकामेवा घातला जातो.
आलू चाट बनवण्यासाठी तुपात उकडलेले बटाटे हलके तळून सैंधव मीठ, दही, हिरवी चटणी आणि डाळिंबाच्या दाण्यांसोबत खाल्ले जातात.
उपवासाला राजगीरच्या पीठापासून डोसा बनवा. हा पदार्थ आंबट ताक, आले आणि हिरव्या मिरच्या वापरून तयार केला जातो. शेंगदाण्याच्या दह्याच्या चटणीसोबत खाल्ला जातो.
उपवासाला गोड पदार्थांमध्ये राजगिरा हलवा हा गोड पदार्थ देखील एक उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही राजगिरा पीठ, तूप, साखर किंवा गूळ पावडर, वेलची पूड आणि बारीक केलेले सुकामेवा याचा वापर करा.