Dhaniya Panjiri Recipe : जन्माष्टमीला श्रीकृष्णासाठी खास नैवेद्य! 'अशी' बनवा फक्त १० मिनिटांत चविष्ट पंजिरी

Shreya Maskar

श्रीकृष्ण जन्माष्टमी

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ४ सप्टेंबर (शुक्रवार) साजरी केली जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात. मध्यरात्री बालकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून त्याचा जन्मोत्सव साजरा करतात.

Shri Krishna Janmashtami | pinterest

दही हंडी

दही हंडीचा उत्सव ५ सप्टेंबरला जगभरात साजरा केला जाईल. या दिवशी उंच दही हंडी बांधली जाते. अनेक सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

Dahi handi | pinterest

श्रीकृष्णचा नैवेद्य

श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून खमंग पंजिरी बनवा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या. पंजिरी हा एक पारंपारिक भारतीय गोड आणि पौष्टिक पदार्थ आहे.

Krishna Janmashtami Naivedya | pinterest

पंजिरी

पंजिरी बनवण्यासाठी धणेपूड, तूप, कमळबीज, पिठीसाखर, किसलेले खोबरे, काजू, बदाम, चिरोंजीच्या बिया आणि खरबुजाच्या बिया इत्यादी साहित्य लागते.

Panjiri | pinterest

धणेपूड

पंजिरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये २ मोठे चमचे तूप गरम करा. नंतर, त्यात धणेपूड घालून ४-५ मिनिटे परतून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.

Coriander | pinterest

कमळबीज

आता धणेपूड एका भांड्यात काढून ठेवा. पॅनमध्ये पुन्हा उरलेले तूप घालून कमळबीज २-३ मिनिटे परतून घ्या.

lotus seeds | pinterest

डायफ्रू्ट्स

मिश्रणात बारीक चिरलेले काजू, बदामचे काप टाका. त्यानंतर चिरोंजीच्या बिया, खरबुजाच्या बिया, साखर, खोबऱ्याची पूड आणि नंतर धणेपूड घालून चांगले मिसळा.

cashew | pinterest

पंजिरी तयार

२ मिनिटे सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर पंजिरी एका स्वच्छ भांड्यात काढा. अशाप्रकारे स्वादिष्ट पंजिरी तयार झाली. तयार केलेली कोथिंबीर पंजिरी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा.

Dhaniya Panjiri | pinterest

NEXT : पावसाळ्यात चाखा गावाकडच्या चवीची 'ही' आंबट-तिखट चटणी, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Chutney Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...