Shreya Maskar
पावसाळा संपण्याआधी आवर्जून गावाकडे बनवतात तशी झणझणीत आंबट-गोड कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवा. फक्त १० मिनिटांत ही रेसिपी तयार होते.
कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिन्याची पाने, टोमॅटो, लसूण, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्या, मीठ आणि लाल मिरची इत्यादी साहित्य लागते.
कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि पुदिन्याची पाने स्वच्छ धुवा. कोथिंबीरीमध्ये माती असते, म्हणून ती २-३ वेळा स्वच्छ धुवा.
हिरव्या मिरच्यांचे देठ कापून टाका आणि कोथिंबीर मुळे काढून टाका. पावसाळ्यात फ्रेश स्वच्छ कोथिंबीर आणि मिरची खरेदी करा.
एका मोठ्या टोमॅटोचा अर्धा भाग २-३ तुकड्यांमध्ये कापून एका भांड्यात ठेवा. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या आणि अर्धा चमचा लिंबाचा रस काढा.
आता मिक्सरचे भांडे घ्या आणि त्यात हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, लसूण, पुदिन्याची पाने वाटून घ्या. आता चवीनुसार बाकीचे साहित्य, मीठ, मिरची आणि लिंबाचा रस घाला.
आता ते व्यवस्थित मिसळून घ्या. जर टोमॅटो रसरशीत असतील तर पाणी घालण्याची गरज नाही, पण तरीही चटणी घट्ट वाटत असेल तर ४-५ चमचे पाणी घालून मिक्सर पुन्हा एकदा फिरवून घ्या.
तयार चटणी एका भांड्यात काढून फ्रिजमध्ये ठेवा. गरमागरम चपाती, भाकरी, पराठा, चिला, डोसा यांच्यासोबत चटणीचा आस्वाद घ्या.