Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात जेवताना काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर गावाकडे बनवतात अगदी तशी झणझणीत वांग्याच्या चटणी बनवा. १० मिनिटांत रेसिपी तयार झाली.

rainy season | pinterest

वांग्याच्या चटणी साहित्य

वांग्याच्या चटणी बनवण्यासाठी वांगी, तेल, कलौंजी, जिरे, कढीपत्ता, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, साखर, व्हिनेगर इत्यादी साहित्य लागते.

Eggplant Chutney Ingredients | pinterest

टोमॅटो

वांग्याच्या चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम तेल गरम करून त्यात कलौंजी आणि जिरे चांगले तडतडू द्या. त्यानंतर यात टोमॅटो आणि कढीपत्ता घालून एक मिनिट परतून घ्या.

tomato | pinterest

वांगी

आता मिश्रणात लाल मिरची, हळद, मीठ आणि साखर घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर वांगी घालून ३ ते ४ मिनिटे शिजवा.

Eggplant | pinterest

व्हिनेगर

त्यानंतर चटणीत व्हिनेगर घाला. आता चटणीवर झाकण ठेवून कमी आचेवर २-३ मिनिटे शिजवा. पुढे सर्व मिश्रण मॅशरच्या मदतीने बारीक करून घ्या.

Vinegar | pinterest

मसाले

शेवटी एकदा चटणीची चव चाखा सर्व मसाले तपासा आणि गॅस बंद करा. त्यानंतर दुसरीकडे गरमागरम भाकऱ्या बनवा.

spices | pinterest

चटणी-भाकरी

गरमागरम भाकरी आणि झणझणीत चटणी खाणे म्हणजे जणू स्वर्ग सुखच होईल. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना हा पदार्थ खूपच आवडेल.

Chutney bhakri | pinterest

वांग्याचे इतर पदार्थ

वांग्यापासून तुम्ही भजी, सुकी भाजी, गेव्ही भाजी, वांग्याची कापे, वांग्याचे भरीत, भरली वांगी आणि वांगी भात अशा विविध रेसिपी बनवू शकता.

Other ingredients of eggplant | pinterest

NEXT : तांदूळ भिजवण्याची झंझट संपली! फक्त १५-२० मिनिटांत 'या' ट्रिकने बनवा मऊसूत इडली

Instant Idli Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...