Shreya Maskar
सकाळचा नाश्ता पोटभर झाला की संपूर्ण दिवस उत्साही राहतो. सकाळच्या नाश्त्याला झटपट इन्स्टंट इडली बनवा. यासाठी तुम्हाला तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही.
झटपट मऊसूत इडली बनवण्यासाठी २ कप रवा, २ कप दही, १ चमचा मीठ, १ मोठा चमचा साखर, १ चमचा इनो आणि १/२ कप पाणी इत्यादी साहित्य लागते.
इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये २ कप रवा, २ कप दही, १ चमचा मीठ आणि १ मोठा चमचा साखर एकत्र मिसळून १५ मिनिटे बाजूला ठेवा.
रवा फुगल्यावर त्यात इनो घाला. तुमचे इडलीचे पीठ तयार झाले आहे. लक्षात घ्या पदार्थाचे प्रमाण योग्य असू दे जेणेकरून रेसिपी नीट होईल.
आता इडली पात्राला तेल किंवा तूप लावा आणि त्यात मिश्रण टाकून १५ मिनिटे इडली वाफवून घ्या, अशाप्रकारे तुम्हाला मऊ आणि टम्म फुगलेल्या इडल्या मिळतील.
गरमागरम तयार झालेल्या इडलीचा चटपटीत चटणीसोबत आस्वाद घ्या. ही रेसिपी सकाळी नाश्ता आणि टिफीनसाठी बेस्ट राहील.
तुम्हाला मिश्रण अधिक लवकर सेट करायचे असेल तर रव्यामध्ये कोमट पाणी टाका. त्यामुळे पीठ लवकर होते आणि चांगले फुलते.
इडलीची चव आणखीण वाढवण्यासाठी त्यात मेथी दाणे, भिजवलेले पोहे, साबुदाणा, चणा आणि उडीद डाळ हे पदार्थ देखील टाकू शकता.