Sharad Pawar Update News Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: मणीपूरच्या राज्यपालांना शरद पवारांचा एक Call अन् प्रॉब्लेम Solve; वाचा संपूर्ण किस्सा

Sharad Pawar Latest News: एकीकडे राज्यात राजीनामा नाट्य सुरू असतानाच सिल्वर ओकवर मात्र वेगळ्याच हालचाली सुरू होत्या. सध्या या प्रकरणाची चांगलीच चर्चा होत आहे...

विजय पाटील

Sharad Pawar Help students stuck in Manipur Violence: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या आठवडाभर अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. ज्याचे केंद्रबिंदू होते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पद सोडल्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.

मात्र या सगळ्या गोंधळातही सिल्वर ओकवर मात्र शरद पवार यांनी माणूसकीचे दर्शन घडवून दिल्याचा एक किस्सा सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये मणिपुर येथील दंगलीत सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एका रात्रीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूत्र फिरविल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, मणिपूरमध्ये (Manipur) सध्या मोठा हिंसाचार सुरू आहे. ज्यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत मधील काही विद्यार्थी अडकले होते. संबंधित विद्यार्थ्यांच्या वडीलांनी ओळखीतून बारामतीच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली होती. याबाबत सचिव प्रल्हाद वरे यांना सांगलीमधून संभाजी कोडग यांचा फोन आला.

त्यांनी त्यांचा मुलगा 'आयआयआयटी' इन्फाळ येथे शिक्षणासाठी आहे. तसेच महाराष्ट्रातील दहा, इतर राज्यातील दोन असे बारा मित्रांसह होस्टेलमध्ये आहेत आणि होस्टेल शेजारी दंगल मोठ्या प्रमाणावर चालू आहे, अशी माहिती सांगितली. त्यामुळे माझ्या मुलाला व त्याच्या मित्रांना वाचविण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनवणी कोडग यांनी केली.

त्यावर वरे यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे जाऊ, असे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. परंतु कोडग यांनी, एवढा पण वेळ नाही कधीही होस्टेलवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. नंतर वरे यांनी त्यांना शरद पवार यांचे स्वीय सहायक राऊत यांचा मोबाईल क्रमांक दिला. कोडग यांनी तातडीने राऊत यांना संबंधित मुलांना आलेली अडचण सांगितली.

पालकांनी मानले आभार...

तेव्हा शरद पवार यांनी मणिपूरचे राज्यपालाना फोन करून संबंधित मुलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी सांगितले. त्यानंतर रात्री बारा वाजता मिल्ट्रीचे चिफ कमांडर यांनी कोडग यांचा मुलगा मयुर कोडग यासं संपर्क साधला. काही काळजी करू नका, सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी लवकरच येत असल्याचे कळविले.

तसेच त्यांनी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवले. शरद पवार यांच्या तत्परतेमुळे मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यामुळे पालकांनी शरद पवार यांचे बारामतीमध्ये भेट घेवून आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT