Manikrao Kokate Resigns as Minister, Hospitalised Amid Arrest Fears in 30-Year-Old Case : ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोषी आढललेल्या माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बुधवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला अन् थेट रूग्णालय गाठलं. ब्लडप्रेशर वाढलं अन् श्वास घेण्यास अडचण होत असल्याने कोकाटे रूग्णालायत दाखल झाल्याचे बोलले जात आहे. कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट निघालेय. नाशिक पोलिस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतात, त्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण कोकाटे रूग्णालयात उपचार घेत आहे.
कोकाटे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात तातडीने धाव घेतली होती. पण कोर्टाकडून शुक्रवारपर्यंत सुनावणीस नकार दिला. त्यामुळे रूग्णालयात असणाऱ्या कोकाटेंना अटक होणार का? अटकेपासून वाचण्यासाठी कोकाटे रूग्णालयात दाखल झाल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात नाशिक न्यायालयाने बुधवारी अटक वॉरंट काढले. त्यानंतर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस आज करणार पुढील कारवाई होणार आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक आज मुंबईला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. ब्लडप्रेशर अन् श्वास घेण्यास अडचण होत असल्यामुळे कोकाटे आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती आहे. नाशिक पोलिसांकडून कोकाटेंना आज अटक कऱण्यात येणार असल्याचे समजतेय.
माणिकराव कोकाटे यांनी क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला अन् महाराष्ट्राच्या राजकाराणात खळबळ उडाली. याआधी त्यांचे कृषीमंत्रिपद काढून घेण्यात आले होते. पण आता फक्त मंत्रिपदच नाही तर आमदारकी जाण्याची शक्यता आहे. ३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणामुळे कोकाटेंचे राजकीय अस्थित्व पणाला लागलेय. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. धनंजय मुंडे यांच्यानंतर आता माणिकराव कोकाटेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण फक्त राजीनाम्यापुरते मर्यादीत नाही तर कोकाटेंची आमदारकीही धोक्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.