Manikrao Kokate News 
महाराष्ट्र

Manikrao Kokate : कोकाटेंना २ वर्षांची शिक्षा, मंत्रिपद जाणार का? कायदा काय सांगतो

Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो.

Namdeo Kumbhar

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा कोर्टाने २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने कोकाटे बंधूंना जोरदार धक्का दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली असून, नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नाशिक जिल्हा कोर्टाकडून दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार का? आमदारकी जाणार का? कायदा काय सांगतो? याची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास आमदार अथवा खासदारकी रद्द होते. त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी जाणार का? अशी चर्चा सुरू झाली.

आयोगाचा नियम काय सांगतो ?

कोणत्याही गुन्ह्यामध्ये किमान दोन वर्षांची शिक्षा झाल्यास ती व्यक्ती सहा वर्षांसाठी अपात्र ठरले. अशी व्यक्ती निवडून आलेली असेल तर तिची निवड (अपिलाची वेळ संपल्यावर) रद्द होते.

त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधी कुणाची आमदारकी रद्द झाली ?

काँग्रेस नेते सुनील केदार यांची डिसेंबर २०२३ मध्ये आमदारकी रद्द झाली होती. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी त्यांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली, त्यानंतर कोर्टाचे आदेश पाठवले होते. कोर्टाचे आदेश मिळाल्यानंतर विधीमंडळाने सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली होती. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांना उभे राहता आले नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

ST Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, आता बंजारा समाजाला हवे, STमधून आरक्षण

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

SCROLL FOR NEXT