Manikrao Kokate: मोठी बातमी! कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा

Agriculture Minister Manikrao Kokate : कृषमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाउ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao Kokate saam tv
Published On

राज्याचे कृषमंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले आहेत. कृषीमंत्री कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावलीय. नाशिक जिल्हा न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होता. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केलाय.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका जुना प्रकरणात ही शिक्षा नाशिकमधील न्यायालयाने सुनावलीय. कोकाटे यांच्यावर गैरव्यवहार आणि अनियमिततेचे आरोप होते. त्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला असून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. विरोधकांनी या प्रकरणावर सरकारवर टीका केली असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Manikrao Kokate
Agriculture Minister: कर्जमाफ होईल म्हणून शेतकरी कर्ज भरत नाहीत; कर्ज बुडवणाऱ्यांचे कृषीमंत्र्यांनी टोचले कान

कोणत्या प्रकरणात अडकले कोकाटे?

हे सर्व प्रकरण १९९५ ते १९९९ दरम्यानचं प्रकरण आहे. याकाळात माजी मंत्री तुकाराम ढिकोळे यांच्या कोट्यातून काही सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भावाला देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या कागदपत्रांमध्ये फेरफार केली आणि फसवणूक केल्याची तक्रार तुकाराम ढिकोळे यांनी दाखल केली होती. याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती, त्यावेळी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षाची शिक्षा सुनावलीय.

Manikrao Kokate
Deputy Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देऊ, गोरेगाव पोलीस स्टेशनला धमकीचा ईमेल

न्यायालयाने दोन वर्षाच्या शिक्षेसह ५० हजार रुपयांचा दंड सुनावलाय. न्यायालयाने शिक्षे सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे हे उच्च न्यायालयात निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.याप्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिलीय. एका मंत्र्यांची गंभीर समोर आली असेल तर चिंतेची गोष्ट आहे.

जर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय तर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिमंडळ आणि राज्याची आब राखत पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसुद्धा तो राजीनामा तातडीने घेतला पाहिजे. जर आरोप असते तर ठीक असतं, पण जेव्हा न्यायालया शिक्षा सुनावते तेव्हा अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असू नये. नंतर कधी ते निर्दोष निघाले तर तेव्हा त्यांनी पुढील निर्णय घ्यावा. पण आता त्यांनी राजीनामा द्यायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com