Deputy Cm Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देऊ, गोरेगाव पोलीस स्टेशनला धमकीचा ईमेल

Threat Call To DCM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देऊ, असा ईमेल गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये आलाय.
Eknath Shinde
Deputy CM Eknath ShindeSaam Tv
Published On

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीय. गोरेगाव पोलिसांना आणि मंत्रालयात धमकीचा ईमेल आलाय. मंत्रालय, जेजे मार्ग पोलीस ठाणे, गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये धमकीचा ईमेल आलाय. एकनाथ शिंदे हे दिल्लीला शपथविधी सोहळ्यासाठी गेले असून ते आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

धमकीचा ईमेल मंत्रालय, जेजे मार्ग पोलीस स्टेशन, गोरेगाव पोलीस स्टेशन या तिन्ही ठिकाणी आल्याने हे धमकी प्रकरण गांभीर्याने घेतलं जात आहे. पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमकीचे फोन आणि ईमेल येत असल्याची घटना समोर आल्या आहेत.

Eknath Shinde
Fadnavis-Shinde Cold War: फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्डवॉर; एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या ९०० कोटी रूपयांच्या प्रकल्पांची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आदेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी मंत्रालयाला आलीय. मंत्रालयात धमकीचा ईमेल आलाय. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या असून या ईमेलचं ट्रकिंग केलं जात आहे. हा मेल कोणी आणि कुठून पाठवण्यात आलाय, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली जाणार असल्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं सीएमपद भाजपमुळे हुकलं? शिंदेंच्या जखमेवर राऊतांनी चोळलं मीठ

मुंबईतल्या जवळपास ७ ते ८ पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल करण्यात आल्याची माहिती मिळालीय. त्यानंतर मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास करण्यात येत आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमकी देण्याचे प्रकार सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील आहेत. दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधीसाठी हे तिन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com