nashik crime news Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: धक्कादायक! बायकोने बाहेरगावी सोबत कामाला यायला नकार दिला; रागाच्या भरात नवऱ्याने केलं हादरवणारं कृत्य

पत्नी बाहेरगावी कामाला सोबत येत नसल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही

अजय सोनवणे

Nashik News: नाशिकमधून धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी बाहेरगावी कामाला सोबत येत नसल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या सटाणा तालूक्यातील देवळाणे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा तालूक्यातील देवळाणे परिसरात दुर्देवी घटना घडली आहे. पत्नी बाहेरगावी कामाला सोबत येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ललिता गांगुर्डे असे मृत महिलेचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

पत्नी ललिता गांगुर्डे या त्यांच्या आईकडे आल्या होत्या. ललिता या त्यांच्या आई गीता पगारे यांच्यासोबत शेतमजुरी करून घराकडे येत होत्या. त्याचवेळी पती म्हाळू गोरख गांगुर्डे याने त्यांचा रस्ता अडवला. पतीने पत्नीचा रस्ता अडवून माझ्यासोबत बाहेरगावी कामाला का येत नाही, याची विचारणा केली. पती म्हाळूने ललिता यांच्याकडे बाहेरगावी कामासाठी सोबत येण्याचा तगादा लावला. मात्र, त्यास पत्नीने नकार दिला. पत्नीचा नकार ऐकून पती म्हाळू भडकला.

पती म्हाळूने रागाच्या भरात सोबत आणलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोके, हात आणि पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात ललिता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पती म्हाळू घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ललिताचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हत्येच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर आरोपी पतीचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्यानंतर आरोपी म्हाळू एका डाळींबाच्या शेतात लपल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले असून जायखेडा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT